Sadabahar | Iffi Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Iffi Goa 2023: इफ्फी नॉन फिचर विभागात सुयश कामत यांच्या 'सदाबहार' कोकणी शॉर्ट फिल्मची निवड

इंडियन पॅनोरमा श्रेणी अंतर्गत निवडलेले हे 45 चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोवा चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

Pramod Yadav

Iffi Goa 2023: गोव्यात होणाऱ्या 54 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात या वर्षी भारतीय पॅनोरमा विभागात दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्सची यादी सोमवारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) प्रसिद्ध केलीय.

यामध्ये नॉन फिचर विभागात सुयश कामत दिग्दर्शित 'सदाबहार' या कोकणी शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे.

इंडियन पॅनोरमा श्रेणी अंतर्गत निवडलेले हे 45 चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोवा चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. 12 तज्ज्ञांच्या ज्युरीने या चित्रपटांची निवड केली होती. ज्युरींना फीचर फिल्म श्रेणीसाठी एकूण 408 चित्रपटांकडून अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 25 चित्रपट निवडले गेले आहेत.

इंडियन पॅनोरमा फिचर फिल्म विभागात मल्याळम् भाषेतील अट्टम हा उद्घाटनाचा चित्रपट असेल, तर नॉन फिचर विभागात अँड्रो ड्रीम्स हा मणिपूरी चित्रपटाने शुभारंभ होईल.

भारतीय पॅनोरमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्समध्ये 'द केरल स्टोरी', 'कांतारा', 'सिर्फ एक बंदा' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय कन्नड, मल्याळम, बंगाली, तमिळ, हिंदी या भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे.

कंटेट, निर्मिती आणि कलात्मकतेच्या उच्च मानकांचे पालन करणारे चित्रपट NFDC आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी गोवा चित्रपट महोत्सवासाठी निवड केली जाते.

1978 साली सुरू झालेल्या इंडियन पॅनोरमा विभागात निवडलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनाही गोवा चित्रपट महोत्सवात सन्मानित केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT