दुधाला 100 टक्के आधारभूत किंमत द्या Dainik Gomantak
गोवा

Goa Milk Price: दुधाला 100 टक्के आधारभूत किंमत द्या, दूध उत्पादकांची मागणी..

दूध उत्पादकांची मागणी: शेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय

दैनिक गोमन्तक

फायद्याची नसलेली ''कामधेनू'' योजना सरकारने बंद करावी. त्याच्याऐवजी दुधावर १०० टक्के आधारभूत किंमत द्यावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. अखिल गोवा दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या आज (बुधवारी) डिचोलीत झालेल्या बैठकीत ही मागणी करून तसा निर्णयही घेण्यात आला. आधारभूत किंमत दूध उत्पादकांच्या थेट खात्यात जमा करावी. अशी मागणीही करण्यात आली.

बोर्डे-डिचोली येथील श्री रवळनाथ देवस्थानात आज घेतलेल्या या बैठकीस संघटनेचे विनोद जोशी, लक्ष्मण मालवणकर, शिवानंद पेडणेकर, अनंत मळीक, शिवानंद बाक्रे, रघुनाथ परब आदी पदाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी मिळून जवळपास ५० दूध उत्पादक उपस्थित होते.

या बैठकीत विनोद जोशी, महादेव गाड्डी आदी दूध उत्पादकांनी आपले विचार मांडले. दूध उत्पादकांसाठी असलेल्या ''कामधेनू''सह अन्य काही योजना कागदोपत्रीच आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोचत नाहीत. बऱ्याच उत्पादकांना त्यांचा लाभ मिळत नाही, असे मत या बैठकीत पुढे आले.

तर आंदोलनाचा पर्याय

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागण्यांचा निश्चितच विचार करेल, असा विश्वास अनेक दूध उत्पादकांनी या बैठकीत व्यक्त केला. या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

कर्ज सुविधा उपलब्ध करा

गायी घेवून दूध व्यवसाय वृद्धिंगत करून उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी चार टक्के व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करा. शेतकरी ज्या गायी विकत घेतात, त्यांचा विमा सरकारतर्फे न उतरविता शेतकऱ्यांना मोकळीक द्यावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

  • 'कामधेनू'' योजना बंद करा.

  • दुधावर शंभर टक्के आधारभूत किमत द्या. ही किंमत थेट खात्यात जमा करावी.

  • गायी घेण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजाने कर्ज सुविधा उपलब्ध करा.

  • गायीचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मोकळीक द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT