Goa Environment | Rajendra Kelkar Dainik Gomantak
गोवा

Goa Environment: 'सेक्रेड फ्लोरा ऑफ गोवा' केरकरांचे लेखन हे केवळ लेखन नसून ते अनुभवाचे बोल

Goa Environment: पर्यावरणाबाबत जागृती होणे ही काळाची गरज आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Environment: आम्ही अशा देशात जन्माला आलो आहोत, जेथे वृक्षांची पूजा केली जाते. पूर्वी कायदे-नियम नव्हते, तरीही निसर्गाचे संवर्धन होत होते. कारण निसर्गाशी भावना जोडलेल्या होत्या. आता केवळ आम्ही आमचा विचार करत पर्यावरणाचा उपभोग घेत आहोत, असे गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सचिव प्रदीप सरमोकादम यांनी केले.

दरम्यान, येथील छायापत्रकार संघटनेच्‍या कार्यालयात आयोजित ‘सेक्रेड फ्लोरा ऑफ गोवा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाबार्डचे उपव्यवस्थापक विजय देशपांडे, लेखक व पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर तसेच विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे उपस्थित होते.

केरकरांचे लेखन हे केवळ लेखन नसून ते अनुभवाचे बोल आहेत, असे सरमोकादम म्‍हणाले. चंद्रकांत शिंदे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण गावस व समृद्धी केरकर यांनी केले तर विठ्ठल शेळके यांनी आभार मानले.

विजय देशपांडे, नाबार्डचे उपव्यवस्थापक-

पर्यावरण तुम्हा-आम्हा सर्वांचे आहे. पर्यावरणाबाबत जागृती होणे ही काळाची गरज आहे. झांडांविषयी बोलणे, लिहिणे, विचार करणे आवश्‍‍यक आहे. हे पुस्तक एक अतिशय चांगला उपक्रम असून नाबार्डने आपली सामाजिक बांधिलकी समजून सहकार्य केलंय.

राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी तथा लेखक-

पर्यावरण माझ्यासाठी जीवन आहे. ज्याप्रमाणे गोव्यात जंगलांची कत्तल होत आहे, ते पाहून अस्वस्थ व्हायला होते. रानांचे संवर्धन गरजेचे आहे. पर्यावरणाचे असंतुलन अनेक समस्या निर्माण करते आणि त्‍याचे विपरित परिणाम आम्‍ही आतापासून भोगत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT