Russian Woman Dainik Gomantak
गोवा

Russian Woman: 'त्या' रशियन महिलेचे गोव्यातही वास्तव्य, गुहेत दिला बाळाला जन्म; पती उद्योगपती असल्याचीही माहिती, अनेक खुलासे समोर

Russian woman Gokarna forest: काही दिवसांपूर्वी रशियन महिला तिच्या दोन लहान मुलींसह कर्नाटकातील गोकर्ण येथील गुहेत आढळून आली होती. याप्रकरणी आता आणखी नवी माहिती समोर आली आहे.

Sameer Amunekar

पणजी : काही दिवसांपूर्वी रशियन महिला तिच्या दोन लहान मुलींसह कर्नाटकातील गोकर्ण येथील गुहेत आढळून आली होती. याप्रकरणी आता आणखी नवी माहिती समोर आली आहे. या महिलेचे गोव्यातही एका गुहेत वास्तव्य होते आणि तिथेच तिने बाळालाही जन्म दिला होता. एवढेच नव्हे, तर तिचा पती हा इस्त्रायल येथील मोठा उद्योगपती असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

नीना कुटीना (४०) असे या महिलेचे नाव असून तिला विभागीय विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने ताब्यात घेतले आहे. तिला तिच्या देशात माघारी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. रशियन महिलेचा व्हिसा २०१७ साली समाप्त झाल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी व्हिसा संपल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेला तिने माहिती दिली होती.

यापूर्वी या महिलेने चार विविध देशांत प्रवास केला होता. नीनाने तिचा पती उद्योगपती असल्याचे सांगितले. ४० वर्षीय व्यक्तीसोबत गेल्या काही वर्षांपूर्वी भेट झाली व पुढे दोघांमध्ये प्रेम झाल्याचे तिने सांगितले. नीना यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्या पतीला संपर्क साधला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात गोकर्ण येथील घनदाट जंगलात एका गुहेत रशियन महिला राहत असल्याचे आढळून आले होते. धक्कादायक बाब म्हणजे महिलेसोबत तिच्या दोन लहान मुलीदेखील आढळून आल्या होत्या.

आध्यात्मिक ओढीतून तिने हे पाऊल उचलले असल्याचे उघड झाले होते. महिलेला गुहेत राहण्याचा मोठा अनुभव असल्याचेदेखील तिने सांगितले होते. इतकेच काय माझी मुले एकदम सुरक्षित असून, त्यांनादेखील गुहेत राहण्यास आवडते. गेल्या काही वर्षांत २० देशांतील जंगलात वास्तव्य केल्याचेदेखील तिने सांगितले.

शोध कसा लागला?

कर्नाटक पोलिस दरडप्रवण भागाची पाहणी करत असताना जंगलामध्ये त्यांना एका गुहेच्या बाहेर कपडे वाळत घातलेले दिसून आले आणि या महिलेचा शोध लागला. त्यानंतर कर्नाटकसह गोव्यातही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इन्शाअल्लाह, मी संपूर्ण चेकपोस्ट उडवून देईन… दहशतवादी उझैदची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल; '005 ब्रिगेड' ग्रुपमध्ये रचला मोठा कट

आयएसआयसोबत बैठक अन् 22 दहशतवाद्यांची यादी! ऑपरेशन सिंदूरनंतर आता नवा खुलासा; POK मधील तळांबाबत जैश कमांडरची जाहीर कबुली

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

SCROLL FOR NEXT