पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

Marathi Breaking News 17 July 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,क्रीडा, मनोरंजन आणि इतर विशेष घडामोडी मराठीमध्ये.
Goa University Controversy
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे बचावला जीव

गोवा विद्यापीठ पेपरफुटी प्रकरणातील संशयित सहाय्यक प्राध्यापक प्रवण नाईक यांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे. काणकोण - सादोळशे येथील पुलावरुन त्याने उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे नाईक यांच्या जीव वाचला आहे. नाईक बेपत्ता झाल्याची तक्रार म्हापसा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

गोव्यात पहिली खासगी सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन

गोव्यात पहिल्या वहिल्या खासगी सोलर इलेक्ट्रिक क्रूझ बोटचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले आहे. एलआरएजे ग्रीन सोल्युशन कंपनीच्या वतीने या क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासह पर्यावरणाला बढावा देण्यासाठी याचा फायदा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आप राजकारण करतंय, त्यांना सांत आंद्रे मतदारसंघात प्रवेश करायचाय; वीरेश बोरकर

आपला सांत आंद्रे मतदारसंघात प्रवेश करायचा आहे, ते त्यांचा राजकीय अजेंडा पुढे रेटत आहेत. एकत्र येण्याऐवजी ते राजकारण करतायेत. आपला दिल्लीप्रमाणे लँड किलिंग गोव्यात घेऊन यायचंय असं दिसतं. क्रूझ सिल्वा यांनी सांत आंद्रे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मला बोलवणे अपेक्षित होते, पण त्यांनी बोलवले नाही, असे आरजीचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले.

साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर. मामलेदारांच्या अनुपस्थितीमुळे आज चौकशी झालीच नाही. आता येत्या मंगळवारी (ता. 22) होणार चौकशी. बेकायदेशीरपणे फंडपेटी फोडल्याचा दावा करून मेघ:श्याम राऊत यांनी तक्रार दाखल केली होती

कळंगुट हल्ला प्रकरण: आरोपी पवारला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जेएमएफसी म्हापसा यांनी कळंगुट हल्ला प्रकरणातील आरोपी अरुण पवारला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि सहआरोपी पर्शाला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

"पाली शिवलिंग धबधब्यावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध" आमदार डॉ. देविया राणे

पर्यावरणाचे संवर्धन करत एकॉटुरिझमला चालना देण्यासाठी पाली शिवलिंग धबधब्यावर वन विकास महामंडळ व वन विभागाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत : आमदार डॉ. देविया राणे

डॉ. राणे यांचा प्रयत्नाने हर घर जल सुविधेला सुरुवात, दाबोस पाणी प्रकलपातून पाण्याची सोय

कित्येक वर्षाची मागणीची पूर्तता, आता गाव टँकर मुक्त. एकूण ४० लाख रुपये खर्च करून नवीन पाण्याची पाइपलाइन घालण्यात आली असून आता दिवसाला 4 तास पिण्यासाठी नळाला पाणी मिळणार आहे.यावेळी आमदारांचा हस्ते विधिवत पूजा करून नळाला पाणी सोडणार आले. या सुविधेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कळंगुटमध्ये चाकूहल्ला प्रकरणात एकाला अटक

टॅटू व्यवसायातील वादाशी संबंधित कळंगुटमध्ये चाकूहल्ला प्रकरणात एक मोठे यश मिळवत, कळंगुट पोलिसांनी सहआरोपी परशुरामला अटक केली आहे. त्याने पीडितेला फोन करून हल्ला झालेल्या ठिकाणी नेले. दरम्यान, मुख्य आरोपी लमाणी अद्याप फरार आहे.

पणजीतील स्टाफ सिलेक्शन कमिशन कार्यालयाचे उद्घाटन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील पट्टो येथील स्पेसेस बिल्डिंग येथे गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन कार्यालयाचे उद्घाटन केले

सरकारी खात्यांतील सर्व रिक्त पदे आयोगामार्फत भरणार!

कर्मचारी भरती आयोगामुळे सरकारी नोकरीत पारदर्शकता. आयोगाकडून आतापर्यंत ७५२ पदांसाठी जाहिरात. परीक्षांतून निवड झालेले ५० जण नोकर्‍यांत रुजू. सरकारी खात्यांतील सर्व रिक्त पदे लवकरच आयोगामार्फत भरणार : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

फोंडा पोलीस हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण

फोंडा पोलीस हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केल्या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा नोंद.

"शिस्तपालन समिती या प्रकरणाची चौकशी करेल" डॉ. अंजली निंबाळकर (काँग्रेस कमिटी, प्रभारी सचिव)

गोव्यातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार अ‍ॅड. कार्लोस फरेरा यांच्या विरोधात लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना गोव्यातील काँग्रेस कमिटीच्या प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, शिस्तपालन समिती या प्रकरणाची चौकशी करेल आणि आवश्यक ती कारवाई करेल.

गोव्याचे नवीन राज्यपाल २६ जुलै रोजी घेणार शपथ

गोव्याचे नवे राज्यपाल अशोक गजपती राजू यांचा २६ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ११.३० दरम्यान शपथविधी.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून २०२५ पर्यंत गोव्यात १६२ कोटी रुपयांचे डिजिटल पेमेंट

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून २०२५ पर्यंत गोव्यात गुगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या यूपीआय अॅप्सद्वारे दररोज सरासरी १६२ कोटी रुपयांचे डिजिटल पेमेंट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com