Russian booked in Goa Dainik Gomantak
गोवा

Russian booked in Goa: हरमल येथे नाईट कँपमध्ये 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; रशियन नागरिकाविरोधात गुन्हा

हरमल येथे आयोजित करण्यात आलेल्या नाईट कँपमध्ये हे कृत्य केल्याचा रशियन नागरिकावर आरोप करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Russian Booked In Goa

सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रशियन नागरिकविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हरमल येथे आयोजित करण्यात आलेल्या नाईट कँपमध्ये हे कृत्य केल्याचा रशियन नागरिकावर आरोप करण्यात आला आहे. पणजी महिला पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजी महिला पोलिसांनी लिया वासुलेव या रशियन नागरिकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. संशयित आरोपीने हरमल समुद्रकिनारी नाईट कँप आयोजित केला होता. यावेळी त्याने सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिस सध्या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक

दुसऱ्या एका घटनेत अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केलेल्या रामनगर (कर्नाटक) येथील स्नेहल निक्कम याला महिला पोलिस पथकाने अटक केली.

न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही तक्रार अगोदर पेडणे पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती व त्यानंतर ती महिला पोलिस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT