Mapusa News | Russian Citizen  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: म्हापशातील डिटेन्शन सेंटरमधून रशियन नागरिक फरार

गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू

Akshay Nirmale

Mapusa News: म्हापसा येथील परदेशी नागरिकांसाठीच्या डिटेन्शन सेंटरमधून एक रशियन नागरिक फरार झाल्याचे समोर आले आहे. दमित्री अलेक्झांड्रोव्ह असे या नागरिकाचे नाव आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

म्हापसा डिटेन्शन सेंटर येथील पोलिस उपनिरीक्षक मार्विन डेसा यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या रशियन नागरिकाविरोधात फॉरेनर्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मार्च रोजी दुपारी 4 ते साडे सहा या काळात ही घटना घडली आहे.

9 फेब्रुवारी रोजी दमित्री याला या डिटेन्शन सेंटरमध्ये दाखल केले होते. या डिटेन्शन सेंटरच्या छताचे लोखंडी खांब कापून दमित्री हा पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर डिटेन्शन सेंटरच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जे परदेशी नागरीक व्हिसाशिवाय प्रवास करतात किंवा अवैध व्हिसावर प्रवास करणारे किंवा व्हिसाची मुदत संपुनही राहणारे जे परदेशी नागरिक असतात, अशांना येथे ठेवले जाते.

(सविस्तर वृत्त देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT