Goan economy Dainik Gomantak
गोवा

'रशिया-युक्रेन युद्धाचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम'

....तर पर्यटनाला फटका बसेल

दैनिक गोमन्तक

रशिया-युक्रेन युद्ध केवळ पर्यटन व्यापारावरच नाही तर गोव्यातील (goa) अर्थव्यवस्थेवरही परिणाम करेल, असे पर्यटन संचालक मेनिनो डिसोझा यांनी आज सांगितले. "युद्धापूर्वी, दोन्ही देशांमधील गोंधळामुळे, चार्टर उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये (Tourism) रशियन लोकांचा मोठा समावेश आहे, जर उड्डाणे रद्द झाली तर पर्यटनाला फटका बसेल, अस मत यावेळी त्यांनी बोलताना मांडले.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (रशिया-युक्रेन युद्ध) चटका तुमच्या खिशालाही बसणार आहे. रशिया-युक्रेन तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत होत्या आणि गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचल्या. गेल्या अडीच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

या अडीच महिन्यांत सरकारी (government) तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. अशा परिस्थितीत आता उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचली आहे. यापूर्वी 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरच्या वर गेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Goa Water Supply: दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा फटका, डिचोलीतील 'ती' मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली! शुक्रवारी दुपारनंतर दुरुस्ती पूर्ण

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

Train Accident: धूर, आरडाओरडा आणि रक्ताने माखलेले लोक! लंडनमध्ये दोन ट्रेनची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 80 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT