Bundeskanzler Olaf Scholz X - Social Media
गोवा

रशिया - युक्रेन युद्ध आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मोठा धोका; जर्मन चान्सलर स्कोल्झ यांचे गोव्यात वक्तव्य

German Chancellor Olaf Scholz Goa Visit: 'युद्ध किंवा शक्तीच्या' जोरावर सीमा बदलण्याचा प्रयत्न करु नये; जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ.

Pramod Yadav

German Chancellor Olaf Scholz Goa Visit

वास्को: 'युद्ध किंवा शक्तीच्या' जोरावर सीमा बदलण्याचा प्रयत्न करु नये. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण हा आज आंतरराष्ट्रीय शांततेसाठी सर्वात मोठा धोका आहे. राष्ट्रीय सीमांची अखंडता हा शांतीचा आधार आहे, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ म्हणाले.

वास्को, गोवा येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) पिलानीच्या विद्यार्थ्यांशी स्कोल्झ यांनी शनिवारी (२६ ऑक्टोबर) संवाद साधला.

स्कोल्झ यांनी मुरगाव बंदरातील जर्मन नौदल जहाज FGS बाडेन-वुर्टेमबर्गलाही भेट दिली.

जर्मन चॅन्सेलर स्कोल्झ यांनी यावेळी एक आठवण सांगितली. संयुक्त राष्ट्रातील केनियाचे राजदूत एकदा सुरक्षा परिषदेत म्हणाले होते की, आफ्रिकन देशांच्या सीमा वसाहती शक्तींच्या अधिकार्यांनी आखल्या आहेत. जर सर्वांनी सीमा शोधण्याचा प्रयत्न केला आणि युद्ध करत गेलो तर आफ्रिकेत शंभर वर्षे युद्ध होईल.

सीमांना धोका निर्माण होता कामा नये. जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी हा एक मुख्य पैलू आहे, असे स्कोल्झ म्हणाले.

भारत आणि जर्मनी नावीन्य आणि आधुनिकतेची कास धरुन पुढे जात आहेत, असे स्कोल्झ म्हणाले. जर्मनीमध्ये आता बरेच भारतीय राहत आहेत ज्यात सुमारे 50,000 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2022 च्या संख्येपेक्षा 50 टक्के जास्त आहे, असे ते म्हणाले.

 जर्मनीचे भारतासोबत चांगले संबंध आहेत. आणि मला हे जाणून अतिशय आनंद झाला की आता भारत जर्मन विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या सर्वात मोठ्या गटाचे प्रतिनिधित्व करतो, असे स्कोल्झ म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3 Goa: भारतीय सैन्यदलातील बिश्वरजीत सायकोम ठरले ‘आयर्नमॅन’चे विजेते, इजिप्तची यास्मिन हलावा महिलांमध्ये अव्वल

Manohar International Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब धमकीचा कॉल आल्याने खळबळ!

Goa Crime: शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवत महिलेला 15 लाखांचा गंडा, पोलीस कर्मचाऱ्यास अटक; फोंड्यातील घटना

Goa News Updates: भूतानी प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा; वाचा दिवसभरातील घडामोडी

गोव्यातील युवकांना दर्जेदार रोजगार न मिळणे हा तर टिकटिकणारा 'टाइमबॉम्ब'!

SCROLL FOR NEXT