दवर्ली येथील रेशल गोम्सही पोहोचली घरी Dainik Gomantak
गोवा

Russia Ukraine War: गोव्यातील अजून एक विद्यार्थिनी पोहोचली घरी

दक्षिण गोव्यातील एकूण 12 विद्यार्थी अडकले : त्यापैकी दोन पोहोचले गोव्यात

दैनिक गोमन्तक

मडगाव: दक्षिण गोव्यातील दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये जिथे घमासान युद्ध चालू आहे तिथे अडकले असले तरी दोन विद्यार्थिनी काल सुखरूप घरी पोहोचल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यात दवर्ली येथील रेशल गोम्स या विद्यार्थिनीचा समावेश आहे.

दक्षिण गोव्याचे (South Goa) अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील एकूण 12 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यापैकी दोघेजण काल गोव्यात पोहोचले. त्यात रेशल बरोबर कुडतरी येथील एका विद्यार्थिनीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

काल आपल्या घरी पोहोचलेल्या रेशल गोम्स हिने प्रत्यक्ष युद्धाला सुरवात होण्यापूर्वीच म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी आपल्या अन्य काही भारतीय विद्यार्थ्यांबरोबर युक्रेन सोडले होते. मात्र नंतर इतर सोपस्कार पूर्ण करायचे बाकी राहिल्याने त्यांना भारतात यायला उशीर झाला. शेवटी शारजाह मार्गाने ती काल गोव्यात पोहोचली.

रेशल गोम्स ही आपला वैद्यकीय अभ्यास पूर्ण करण्यासाठी युक्रेनला गेली होती. युक्रेनहुन गोव्यात पोहोचण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल बोलताना ती म्हणाली, आम्ही प्रत्यक्ष युद्ध (Russia and Ukraine War) सुरू होण्यापूर्वी युक्रेन सोडले होते. त्यामुळे आम्हाला फारसे काही त्रास झाले नाहीत. मात्र युद्ध सुरू होणार अशा बातम्या त्याहीवेळी येऊन धडकत होत्या. त्यामुळे आमच्या उरात धडकी भरली होतीच, असे ती म्हणाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

SCROLL FOR NEXT