Russia-Ukraine Crisis Dainik Gomantak
गोवा

Russia-Ukraine Crisis: संभाव्य युद्धाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम शक्य

रशियाकडून युक्रेन देशाचे विभाजन, बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशांना स्वातंत्र्य जाहीर

दैनिक गोमन्तक

मॉस्को: युक्रेनच्या पूर्व भागात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोन प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी जगाला धक्का दिला. तसेच, या दोन प्रदेशांमध्ये सैन्य तैनात करण्याचे आदेशही देत त्यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी पूर्ण केल्याचे मानले जात आहे. (Russia-Ukraine Crisis)

पुतीन यांनी सोमवारी रात्री लुहान्स्क आणि दोनेत्स्क या बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. युक्रेनवर हल्ला करण्याचा कोणताही इरादा नसल्याचे सांगणाऱ्या रशियाने आधी बंडखोरांच्या मदतीने पूर्व भागातील लुहान्स्क आणि दोनेत्स्क या प्रदेशांमध्ये आधी संघर्ष सुरू केला आणि आता त्या भागांचे स्वातंत्र्य मान्य करत तो भाग विलीन करून घेण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचाही याच पद्धतीने ताबा मिळविला होता. या भागाच्या स्वातंत्र्याला आम्ही 2014 मध्येच मान्यता दिली होती आणि आता येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठीच सैन्य पाठवित आहोत, असा दावा रशियाने केला आहे. पुतीन यांनीही आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. रशियाच्या मान्यतेनंतर बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशांमधील नागरिकांनी जोरदार आतषबाजी केल्याचा दावाही रशिया सरकारने करत छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

भारताला हवी शांतता

युक्रेनचा (Ukraine) वाद चर्चेने काढावा, अशी इच्छा आहे. अमेरिका व रशियामध्ये (Russia) चर्चा झाली तर यावर नक्कीच उपाय निघेल. भारताला शांतता हवी आहे अशी प्रतिक्रिया देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी घाबरून जाऊ नये. नियमावली जाहीर केली आहे. भारतीय आपल्या दूतावासाच्या संपर्कात आहेत असे परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी सांगितले.

गोव्यावर काय परिणाम होणार

रशियाने आपले सैन्य युक्रेनच्या हद्दीत घुसवले आहे. यामुळे युद्धाचा भडका उडण्याची शक्यता असून यात आता इंग्लंड आणि अमेरिका उडी घेण्याची शक्यता आहे. हे दोन्ही देश आपल्या गोव्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणाऱ्या गोव्यावर (Goa) अशा युद्ध सदृश्य परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे असे मत पर्यटन व्यवसायिक आणि ट्रॅव्हल्स अँड टुरिझम (Tourism) असोसिएशनने व्यक्त केले आहे.

युद्ध किंवा युद्धसदृश परिस्थितीमुळे सर्वात प्रथम पर्यटन व्यवसाय विपरीत परिणाम होतो. सध्या कोरोनामुळे गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ पर्यटन व्यवसाय मंद गतीने सुरू आहे यातच आता अशा दोन देशांतर्गत युद्धांचा परिणाम पर्यटनावर होऊ शकतो. राज्यात युक्रेनपेक्षा रशियावरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. नोव्हेंबर, डिसेंबर या दरम्यानच्या काळात प्रश्नावरून काही पर्यटन चार्टर्ड आले आहेत. यातून आलेल्या पर्यटकांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे. मात्र, युक्रेनवरून अद्यापही चार्टर आले नसले तरी इतर देशांमधून युक्रेनमधील पर्यटक राज्यात आले असावेत. मात्र, यापुढे यावर परिणाम होऊ शकतो असे मत ट्रॅव्हल आणि टुरिझम असोसिएशनने व्यक्त केला आहे.

युक्रेन-रशियाचा वादाचा परिणाम गोव्यातील पर्यटनावर होऊ शकतो. कोरोनामुळे बंद असलेल्या पर्यटनाला उभारी येणार असा अंदाज होता. मात्र, आता संभाव्य युद्धामुळे पर्यटन क्षेत्राचे नुकसान होईल.

-निलेश शहा, अध्यक्ष ट्रॅव्हल्स अँड टुरिझम असोसिएशन

इंग्लंड व रशियावरून पर्यटकांना घेऊन येणारे चार्टर विमान सेवा जिओबबलमध्ये सुरू आहे. मात्र, ते आता बंद होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीचा फटका विमानसेवेलाही बसू शकतो.

-गगनदीप मलिक, संचालक गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT