King Momo Carnival 2023 Dainik Gomantak
गोवा

King Momo Carnival 2023: यंदाच्या कार्निव्हलसाठी किंग मोमो म्हणून 'यांची' निवड

गोवा पर्यटन विभागाची माहिती

Akshay Nirmale

King Momo Carnival 2023: गोव्यात होणाऱ्या यंदाच्या कार्निव्हलसाठीच्या किंग मोमोचा शोध आता पुर्ण झाला आहे. मडगाव येथील रसल डिसुजा (Russel D'Souza) यांची किंग मोमो म्हणून निवड करण्यात आली आहे. पणजीत १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्निव्हल परेडचे नेतृत्व यंदा किंग मोमो रसल डिसुजा करतील. गोवा पर्यटन विभागाने सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे.

कार्निवल 2023 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर पर्यटन विभागाने किंग मोमो होण्यासाठी अर्ज मागवले आहेत.20 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. पर्यटन विभागाने आवाहन करताना म्हटले होते की, कार्निव्हलच्या इतिहासातील सर्वात प्रिय राजेशाही खेळ खेळण्याचे स्वप्न तुम्ही स्वप्न पाहिले आहे का? तुमच्याकडे किंग मोमो बनण्याचे व्यक्तिमत्व आणि प्रतिभा असेल तर ती दाखवा आणि गोव्यातील सर्वात मोठ्या उत्सवाचे केंद्रबिंदू व्हा!”

किंग मोमो कार्निव्हलचा अधिकृत राजा असतो. नर्तक, विदूषक आणि संगीतकारांचा समावेश असलेल्या त्याच्या पथकाच्या परेडचे नेतृत्व तो करतो. तोच ‘आनंदाचा हुकूम’ घोषित करतो.

या दिवशी होणार कार्निव्हल...

2023 चे कार्निव्हल 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये 4 मुख्य ठिकाणे असून इतर 2 ठिकाणेही असणार आहेत. पणजीत १८ फेब्रुवारी, मडगाव १९ फेब्रुवारी, वास्को २० फेब्रुवारी तर म्हापशात २१ फेब्रुवारी रोजी कार्निव्हल होणार आहे. कार्निव्हल परेडसाठी आयोजकांना मार्ग ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT