water tanker  Dainik Gomantak
गोवा

टँकरच्‍या पाण्‍यासाठी हरमल येथे पळापळ

नळांना पाणी नाही; मात्र बिले वेळेवर हातात

दैनिक गोमन्तक

मोरजी: हरमल आणि परिसरात पाण्‍याची समस्‍या तीव्र बनली आहे. गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून नळांना पाणीच आलेले नाही. मात्र बिले वेळेवर हातात दिली जातात, अशी माहिती संतप्‍त नागरिकांनी दिली. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, पण तो अपुरा होतो. शिवाय भांडी भरून उंच ठिकाणी पाणी नेताना खूप त्रासदायक ठरते.

पेडणे तालुक्याला चांदेल जलप्रकल्पातून पुरविला जाणारा पाणीपुरवठा अनियमित असतो. मांद्रे मतदारसंघात तर या प्रकल्‍पाचे पाणी पोचतच नाही.

सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण ते पाणी पिण्‍यास योग्‍य नसते. तसेच ते उंच ठिकाणी नेणेही खूप जिकरीचे बनते. तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रे मतदारसंघातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन 30 एमएलडी क्षेमतेचा जलप्रकल्प उभारण्याची योजना आखली होती. परंतु नंतर ती रखडली ती पुन्‍हा सुरू झालीच नाही. परिणामी या हरमल, मांद्रे परिसरातील लोकांना पाण्‍यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आता कोठे मार्च महिना सुरू आहे. आणखी दोन महिने पाण्‍याशिवाय कसे काढायचे, हा प्रश्‍‍न लोकांना सतावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT