TMC National Vice President Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

TMC चे उपाध्यक्ष लुईझीन फालेरो यांच्या राजीनाम्याची अफवाच

परंतु अजून फातोर्ड्यातून उमेदवारी का भरलेली नाही हा प्रश्न आहेच.

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लुईझीन फालेरो यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला काही दिवसांपूर्वीच रामराम ठोकला होता. या नंतर फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु मागील काही दिवस फालेरो यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. दरम्यान यावर स्पष्टीकरण देत फालेरो म्हणाले, "मी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे ह्या केवळ अफवा आहेत. गोमंतकीयांकडून तृणमूलला मिळणार्‍या पाठिंब्यामुळे नाराज झालेल्या लोकांकडून हा अपप्रचार चालू आहे." (Rumors of TMC National Vice President Luizin Falero's resignation in Goa)

फातोर्ड्यातून Fatorda उमेदवारी भरावी यासाठी तृणमूलकडून दबाव येत असल्यामुळे तृणमुलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझीन फालेरो यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची अफवा समाज माध्यमातून फिरू लागल्याने राजकिय वर्तुळात गोंधळ उडाला.

मात्र नंतर तृणमुलने या वृत्ताचा इन्कार करणारे फालेरो यांचे ट्विट प्रसारित करून या वादावर पडदा टाकला. असे जरी असले तरी फालेरो यांनी अजून फातोर्ड्यातून उमेदवारी अर्ज भरलेला नाही.

फालेरो यांचे जे ट्विट प्रसारित करण्यात आले आहे त्यात आपण राजीनामा दिला हे असत्य असून तृणमूलची वाढती लोकप्रियता सहन होत नसल्याने ही अशी अफवा पसरविण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

फालेरो याना कुठल्याही परिस्थितीत फातोर्डातून लढणे नको असून आपला निर्णय त्यांनी पक्षाला सांगूनही पक्षाने अजून उमेदवार न बदलल्याने फालेरो अत्यंत नाराज झालेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज हे राजीनाम्याचे वृत्त पसरले.

दरम्यान, तृणमुलतर्फे अजूनही फातोर्ड्यात कुणी उमेदवारी भरली नसून उद्या शेवटच्या दिवशी फालेरो उमेदवारी भरणार की दुसरा उमेदवार निवडणार याबद्दल राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT