Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak

Goa Politics: जयेश साळगावकरांच्या 'त्या' आरोपावर मायकल लोबोंचे प्रत्युत्तर

10 मार्च रोजी जयेशला त्याची खरी जागा कळेल असे आरोप मायकल लोबो Michael Lobo यांचे विधान
Published on

गोवा: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र चालूच आहे. यातच मायकल लोबो यांच्यावर भाजप उमेदवार जयेश साळगावकर यांनी आरोप केले. (Michael Lobo reaction on goa bjp candidate jayesh Salgaonkar allegation)

Michael Lobo
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिगंबर-बाबूमध्ये जुंपली

या आरोपाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले "साळगावचे भाजप उमेदवार BJP Candidate जयेश साळगावकर jayesh salgaonkar यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून. मी कोणत्याही फ्लॅटमध्ये वाटण्यासाठी पैसे ठेवलेले नाहीत. तसेच घाण विचरसारणी असणाऱ्या पक्षात ते सामील झाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. 10 मार्च रोजी जयेशला त्यांची खरी जागा कळेल असे आरोप मायकल लोबो Michael Lobo यांनी केले."

लोबो यांच्यावर निवडणुकीच्या काळात पैसे वाटप करत असल्याचा आरोप जयेश साळगावकर यांनी केला होता यावर लोबोंनी आपले मौन सोडत आपली प्रतिक्रिया मांडली आहे. राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यातच राजकीय नेत्यांच्यात असे बंडखोरीचे वातावरण वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com