Rumdamol Dovorlim News Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Dovorlim: रुमडामळ-दवर्लीत कचऱ्याच्या राशी! रोगराई वाढण्याची भीती; आमदारांनी लक्ष घालण्याची स्थानिकांची मागणी

Rumdamol Dovorlim Garbage: मागील ९ महिन्यांपूर्वी येथील एका पाच वर्षांच्या मुलाचा डेंग्यू झाल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर काही ठिकाणच्‍या कचऱ्याची उचल करण्यात आली होती.

Sameer Panditrao

फातोर्डा: सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेले उल्हास तुयेकर यांच्या नावेली मतदारसंघातील रुमडामळ-दवर्ली पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी उघड्यावर कचऱ्याच्या राशी साचल्या असून त्यामुळे येथील परिसर गलिच्छ दिसून येत आहे.

या कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोल व इतर घातक कचऱ्याचा समावेश आहे. हा कचरा येथे उघड्यावर टाकण्यात येत असल्याने रोगराई पसरण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

मागील ९ महिन्यांपूर्वी येथील एका पाच वर्षांच्या मुलाचा डेंग्यू झाल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर काही ठिकाणच्‍या कचऱ्याची उचल करण्यात आली होती व या परिसरात आरोग्य विभागाकडून कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात आली होती.

ही पंचायत नावेली मतदारसंघाअंतर्गत येत असल्याने स्थानिक आमदार तुयेकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. येथील कचरा तातडीने हटविण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

भंगारअड्ड्यांत वाढ

या पंचायत क्षेत्रात भंगार अड्ड्यांचीही वाढ झाली आहे. या भंगार अड्ड्यांत टाकाऊ इलेक्ट्रिकल वस्तू, टाकाऊ टायर, गाड्यांचे सुटे भाग या भंगार गोळा करणाऱ्यांनी साठवून ठेवले आहेत. यातील अनेक वस्तू कित्येक वर्षांपासून त्याच ठिकाणी पडून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT