Dovorlim Dicarpale: सर्वच रस्ते खणलेले! ग्रामस्थांनी करायचे काय? दवर्ली- दिकरपाल ग्रामसभेत वादंग

Dovorlim Dicarpale Panchayat: दवर्ली-दिकरपाल पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी विविध सरकारी खात्यांनी रस्ते खणून ठेवले आहेत.
Davorlim Dikarpal Roads
Davorlim DikarpalDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: दवर्ली-दिकरपाल पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी विविध सरकारी खात्यांनी रस्ते खणून ठेवले आहेत. तसेच हे काम मंदगतीने सुरू असल्याने पादचारी तसेच वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे. एकाच वेळी सर्व रस्ते खणून ठेवण्याच्या प्रश्नावर दवर्ली-दिकरपाल ग्रामसभेत गरमागरम चर्चा झाली.

ही कामे पूर्ण का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला. गॅस पाईपलाईन व सिवरेज पाईपलाईन कामांसाठी रस्ते खणलेले आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी उपस्थितांनी केली.

रविवारच्या ग्रामसभेत पंचायत क्षेत्र स्वच्छ व हरित ठेवण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना काही नागरिकांनी केली.

Davorlim Dikarpal Roads
Davorlim Dicarpale Panchayat: दवर्ली-दिकरपाल पंचायतीवर पहिल्‍यांदाच भाजपचा झेंडा

पंचायतराज कायद्यांतर्गत पंचायतीने अद्याप विविध समित्यांचे गठन केलेले नाही. हा मुद्दा सुद्धा चर्चेला आला. शेतीकामासाठी पंचायतीने सहकार्य करावे, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली. त्यांची मागणी पूर्ण केली जाईल, असे यावेळी पंचायतीतर्फे सांगण्यात आले. या ग्रामसभेत २०२५ - २०२६ या काळातील अर्थसंकल्पाला संमती देण्यात आली.

Davorlim Dikarpal Roads
Dovorlim Dikarpal Panchayat: दवर्ली-दिकरपालचे लवकरच 'सीमांकन', खासगी सर्वेक्षकाची केली जाणार नियुक्ती; उपसरपंच आर्लेकरांची माहिती

आमदार उल्हास तुयेकर यांना निवेदन सादर

पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने मे महिन्यापर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण व्हायला हवीत, असे नागरिकांनी पंचायतीला सांगितले. आम्ही स्थानिक आमदार उल्हास तुयेकर यांच्याशी संपर्क साधला आहे. शिवाय ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत, अशा आशयाचे निवेदन आमदारांना दिल्याचे पंचायतीतर्फे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com