Rumdamol: ‘त्या’ फुग्यांमध्ये होता घातक हेलियम वायू! गॅसपुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित; सखोल चौकशीची मागणी

Rumdamol Ballon Blast: पोलिस अधीक्षक सुचेता देसाई यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असतानाच फुग्यांना आग लागली. यात गॅसने भरलेल्या फुग्यांचा स्फोट होऊन आग भडकली. त्यामुळे देसाई यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला काहीशी दुखापत झाली.
Ballons Helium Gas
Ballons Helium GasCanva
Published on
Updated on

Rumdamol Ballon Blast Helium Gas

पणजी: रुमडामळ पंचायत मैदानावर शनिवारी एका शाळेचा वार्षिक क्रीडा दिवस साजरा करताना उदघाटनावेळी गॅसने भरलेल्या फुग्यांना अचानक आग लागली. त्यात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पोलिस अधीक्षक (ट्रेनिंग) सुचेता देसाई यांना दुखापत झाली. ही घटना वर वर साधी, सोपी वाटत असली तरी हा प्रकार अत्यंत संवेदनशील आहे.

कारण जे फुगे आणले गेले होते, त्यातील ‘हेलियम’ हा घातक वायू कायदेशीररित्या भरण्यात आला होता का? ज्यांच्याकडून हे फुगे फुगवून आणले होते, त्यांना कोणत्या कंपनीने हेलियम गॅसपुरवठा केला? या सर्व कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या होत्या का? असे प्रश्न आता तज्ज्ञांकडून उपस्थित होऊ लागले आहेत.

नैसर्गिक वायूच्या अभ्यासकांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, हेलियम वायू सहजासहजी उपलब्ध होत नाही. तो फुग्यात वापरला जात असल्याने त्यासाठी अनेक कायदेशीर परवाने घ्यावे लागतात. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हा वायू वापरला जातो. त्यासाठी त्यांना विविध सरकारी खात्यांकडून परवाने घ्यावे लागतात. त्यामुळे रुमडामळ येथे घडलेली घटना सहजपणे घेता येणार नाही.

पोलिस अधीक्षक सुचेता देसाई यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असतानाच फुग्यांना आग लागली. यात गॅसने भरलेल्या फुग्यांचा स्फोट होऊन आग भडकली. त्यामुळे देसाई यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला काहीशी दुखापत झाली. याशिवाय व्यासपीठावरील इतरही मान्यवरांनाही दुखापत झाली. यावेळी पोलिस अधीक्षकांना तत्काळ खासगी इस्पितळात नेण्यात आले. प्रथमोपचाराअंती त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, आयोजकांनी फार मोठी दुर्घटना घडली नसल्याचे सांगितले.

Ballons Helium Gas
Banavali Crime: आधी विश्वास संपादन केला, मग ‘हात की सफाई’, 3 कारागिरांनी पळवले ७२ लाखांचे सोने

प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी

अभ्यासकांच्या मते, फुगे फुगविण्यासाठी जो काॅम्प्रेसर आणला असेल, तर तो कोणाकडून आणला? किंवा फुगविलेले फुगे कोणाकडून आणले होते? याची आयोजकांना उत्तरे द्यावी लागतील. या प्रकरणाचा तपास होणे आवश्यक असून, आयोजकांवर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सुरक्षिततेची काळजी न घेतल्याबद्दल पोलिस अधीक्षकांवरही कारवाई होऊ शकते, अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com