Sarvona Junction  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: रंब्लर्समुळे वाढली डोकेदुखी! 'डिचोली-साखळी' रस्त्यावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

गोमन्तक डिजिटल टीम

Sarvona Junction Bicholim Sanquelim Road Rumblers Issue

डिचोली: डिचोली-साखळी रस्त्यावरील सर्वण जंक्शनजवळ बसविण्यात आलेले ''रंब्लर्स'' धोकादायक बनत असून, या रंब्लर्समुळे दिवसेंदिवस डोकेदुखी वाढू लागली आहे. हे रंब्लर्स अपघातांना आमंत्रण ठरत आहे.

सोमवारी रात्री या रंब्लर्सवर दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन दोन युवक जखमी झाले. हे रंब्लर्स काढून त्याठिकाणी ''गतीरोधक'' बसवावेत. अशी वाहनचालकांची मागणी आहे. अपघातांचा धोका टळावा म्हणून डिचोली शहरासह मुख्य रस्त्यावर साखळी, सर्वण आदी काही ठिकाणी ''रंब्लर्स'' घालण्यात आले आहेत.

मात्र काही ठिकाणी रंब्लर्स व्यवस्थित घालण्यात आलेले नाहीत. या रंब्लर्समुळे वाहनांच्या सुट्या भागांची मोडतोड तर होतेच, याशिवाय वाहनचालकांसह इतर प्रवाशांच्या कंबरड्यांना मार बसत आहे. अशा वाढत्या तक्रारी आहेत. हा त्रास वाचविण्यासाठी काही वाहन चालक तर वाहनांच्या गतीवरही नियंत्रण ठेवत नाहीत.

परिणामी अपघातही घडत आहेत. तीन महिन्यांपूर्वी साखळी येथे रंब्लर्समुळे एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला होता. रंब्लर्सवरून दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असली, तरी सर्वण येथे ''रंब्लर्स'' बसवताना नियोजनाचा अभाव झाल्याचे दिसून येत आहे. अनावश्यक प्रमाणात आणि नियोजन न करता ''रंब्लर्स'' बसविण्यात आले आहेत. हे ''रंब्लर्स'' म्हणजे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

डिचोली-साखळी रस्त्यावरील सर्वण जंक्शनजवळ चार महिन्यांपूर्वी ''रंब्लर्स'' बसविण्यात आले आहेत. सर्वण जंक्शन ते गोकुळवाडापर्यंत साधारण पाव किलोमीटर अंतराच्या आत सहाठिकाणी ''रंब्लर्स'' घालण्यात आले आहेत. त्याशिवाय मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या सर्वणच्या अंतर्गत रस्त्यावरही ''रंब्लर्स'' घालण्यात आले आहेत.

‘रंब्लर्स’कडे दुर्लक्ष

लोकांच्या विरोधामुळे डिचोली शहरातील व्हाळशी येथील मुख्य रस्त्यावरील ''रंब्लर्स'' काढून गतिरोधक बसवले आहेत. त्याच धरतीवर सर्वणमधील ''रंब्लर्स'' काढून त्याठिकाणी ''गतीरोधक'' बसवावेत. नाहीतर या ''रंब्लर्स''चा आकार लहान करावा, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier's Exposition: पोप फ्रान्सिस यांना निमंत्रित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी !!

'World Pharmacist Day' निमित्य औषधविक्रेत्यांचे आरोग्य प्रणालीतील स्थान, कोविड काळातील सेवा, लसीकरणातली भूमिका याबद्दल जाणून घ्या..

Vegetable Rates: मुसळधार पावसाचा फटका; गोव्यात भाज्यांचे दर वाढले

Ponda Crime: ..'संशय' आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा! वाढत्या चोऱ्या आणि गुन्ह्यांवरून नागरिकांना 'सतर्क' राहण्याचे आवाहन

New Borim Bridge: 'बोरी पुलाचे' काम पुढे जाणार? 'भूसंपादन'ची नोटीस कुठे आहे असा शेतकरी संघटनेचा प्रश्न

SCROLL FOR NEXT