Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: टीसीपीतील 39 -ए नुसार आरपी, ओडीपीसाठी नियम अधिसूचित

Goa News: गोवा नगर व शहर नियोजन (टीसीपी) खात्यातर्फे कायद्याच्या 3-ए चा वापर करून प्रादेशिक आराखडा (आरपी) किंवा बाह्यविकास आराखडा (ओडीपी) नियम 2024 मधील जमिनीच्या झोन बदलण्याचे नियम अधिसूचित केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News:

गोवा नगर व शहर नियोजन (टीसीपी) खात्यातर्फे कायद्याच्या 3-ए चा वापर करून प्रादेशिक आराखडा (आरपी) किंवा बाह्यविकास आराखडा (ओडीपी) नियम 2024 मधील जमिनीच्या झोन बदलण्याचे नियम अधिसूचित केले आहेत. रूपांतरासाठी या नियमांमध्ये शुल्कदेखील नमूद केले आहे.

ज्या जमिनीचे रूपांतर करायचे आहे, त्यानुसार हे शुल्क 500 ते 50 हजारांपर्यंत आकारण्यात येणार आहे. झोन बदलासाठीचे शुल्क 50 रुपये ते 400 रुपये प्रतिमीटरप्रमाणे आकारण्यात येणार असून कोणत्या प्रकारचा झोन आहे, त्यावर हे शुल्क अवलंबून असेल.

पर्यावरण संवेदनशील असलेल्या विशिष्ट प्रकारच्या जमिनींचा भू-परिवर्तनासाठी विचार केला जाणार नाही. झोनमधील सर्व बदलांच्या अर्जांची सूचना मुख्य नगरनियोजकाला द्यावी लागेल.

प्रस्तावित जमिनीच्या झोनबदलाची सूचना अधिकृत राजपत्रात आणि दोन स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी लागेल, ज्यात सरकारी राजपत्रात आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत लोकांकडून सूचना मागविल्या जातील, असे नियमांमध्ये नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT