Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Margao RTO: मडगावात बेकायदा पार्क केलेल्या ‘रेंट अ बाईक’वर आरटीओची धडक कारवाई

परवाना निलंबित करणार

Akshay Nirmale

Margao RTO: मडगाव नगरपालिका परिसरातील सर्व ठिकाणच्या पार्किंग जागा ‘रेंट अ बाईक’वाल्यांनी हडप केल्याप्रकरणी नगरपालिकेने आरटीओ कार्यालयात तक्रार केली. आरटीओने त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली असून आज बेकायदा ‘पार्क’ केलेल्या सहा दुचाक्यावर कारवाई केली.

सार्वजनिक ठिकाणी ही वाहने पार्क केलेली आढळल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्यात येणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

याविषयी मडगाव नगरपालिकेत आरटीओ, ट्राफिक वाहतूक अधिकारी, मडगाव व गांधी मार्केट बाजार अध्यक्ष तसेच नगरपालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व पालिकेचे नगरसेवक यांच्यात चर्चा होऊन या प्रकरणी सर्व्हे करून हा प्रश्न निकालात काढण्याविषयी निर्णय घेण्यात आला होता.

नगरसेवक महेश आमोणकर यांनी हा प्रश्न उचलून धरला होता आणि याविरुद्ध अनेकवेळा आवाज उठविला होता. या बैठकीवेळी आरटीओ अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले, की या रेंट अ बाईकवाल्यांना परमिट देते वेळी ही वाहने आपल्या घराकडे किंवा कार्यालयासमोर पार्क करण्याची अट घालण्यात येते.

मात्र ही वाहने सार्वजनिक ठिकाणी पार्क करण्यात येत असल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असून वाहनांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. यावर बोलताना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की या ‘रेंट अ बाईक’वाल्याना नगरपालिकेकडून कोणताही परवाना देण्यात आलेला नाही.

त्यांच्याकडून या ठिकाणी पार्क करण्यात येत असलेली वाहने इतरांना अडथळ्याची ठरत असल्याचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी निदर्शनास आणून दिले होते. तसा त्यांनी पत्रव्यवहारही केलेला आहे.

मडगाव परिसरात बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्यांना आपल्या दुचाकी पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही, त्यामुळे या रेंट अ बाईकवाल्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी पत्रव्यवहारात नमूद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 28 August: जुने वाद संपतील, प्रॉपर्टी ताब्यात येईल; कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या..

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

SCROLL FOR NEXT