Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

कृषिमंत्री रवी नाईकांच्या नातेवाईकांसाठी ‘कदंब’ने मोडले नियम

दुकानासाठी सवलत दिल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : कदंब परिवहन महामंडळाने कृषिमंत्री रवी नाईक यांच्या नातेवाईकांसाठी दुकानासंदर्भातील नियम धाब्यावर बसवून त्यांना सवलत दिली आहे. यासंदर्भातील धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी माहिती अधिकाराखाली उघड केली आहे.
अधिक माहिती अशी, की कदंब परिवहन महामंडळाच्या (केटीसी) पणजी बस स्थानकावरील 32 क्रमांकाचे दुकान नुरूद्दीन हमीराणी हे चालवत होते. (rti reveals that ktc bent best rules for ravi naik kin)

2 ऑक्टोबर 2017 रोजी या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. हे दुकान कृषिमंत्री रवी नाईक यांचे चिरंजीव रॉय नाईक यांच्या सासऱ्यांनी भाडे तत्त्वावर घेतले आहे. 10 जून 2021 रोजी त्यांनी हे दुकान चालवण्यास आपण असमर्थ असल्याने केटीसीने ते माघारी घ्यावे, असे पत्र लिहिले होते.

पुढे 15 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी हेच दुकान चालवण्यास अनुमती द्यावी, असे दुसरे पत्र दिले होते. या दुकानाचे जून 2021 ते जानेवारी 2022 यादरम्यानचे थकित भाडे 43 हजार 546 रुपये त्यांनी भरणे अपेक्षित असताना त्याऐवजी केवळ प्रतिमहा 10 हजार रुपये भाडे आणि 75 हजार रुपये परवाना शुल्क भरून हमीराणी यांना चालवण्यास देण्यात आले आहे. या व्यवहारामध्ये केटीसीने दुकानांसाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले असून हे केवळ रवी नाईक यांच्या नातेवाईकांसाठी केले असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी केला आहे. इतर दुकानदारांप्रमाणे याही दुकानाला नियमित भाडे आकारण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT