Girish Chodankar on BJP
Girish Chodankar on BJP Dainik Gomantak
गोवा

आरएसएस म्हणतं भाजप फटिंगाचा बाप, गिरीश चोडणकरांचा खोचक टोला

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपने आजपर्यंत सर्वच पक्षांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुणीही भाजपला पाठिंबा देणार नाही. मगो, गोवा फॉरवर्डला भाजपने लाथ मारुन हाकललं आहे, त्यामुळे त्यांचाही पाठिंबा काँग्रेसलाच मिळेल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. आरएसएसनेही भाजपला फटिंगांचा बाप म्हटल्याचा खोचक टोला चोडणकरांनी लगावला आहे. (Girish Chodankar on BJP News Updates)

सर्वच पक्षांचा भाजपकडून विश्वासघात झालाय. मागच्या निवडणुकीत आमचे 10 आमदार नेले, त्यांनाही भाजपने डावललं आहे. भाजपने समजून राहावं की त्यांच्यासोबत कुणीही नाही, अशा शब्दात चोडणकरांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. आमचे फोन टॅप करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. त्यापेक्षा आम्हाला विचारा, आम्हीच सांगू आम्ही कुणाशी बोलतोय, असं म्हणत फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरुन चोडणकरांनी भाजप (BJP) सरकारचा समाचार घेतला.

सरकार काम गुंडगिरी संपवण्याचं असतं, मात्र हे सरकारच गुंडांना घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करतं आहे. काँग्रेस (Congress) ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याचा बंदोबस्त करावा, असा इशाराही चोडणकरांनी दिला आहे.

गोमंतकीय जनता यावेळी जागृत झाली आहे, त्यामुळे भाजपचं काहीही चालणार नाही. मॉरेन रिबेलोंच्या फोनचा गैरवापर होतोय, सत्तेचा गैरवापर करु नका, असा इशारा गिरीश चोडणकरांनी दिला आहे. अनधिकृत गोष्टींमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी पडू नये, असंही त्यांनी बजावलं आहे.

दरम्यान निकालानंतर लगेच आमदारांची बैठक होणार आणि तेच आपला नेता ठरवतील, असंही चोडणकरांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस आमदारांना त्यांचा नेता निवडण्याचं स्वातंत्र्य देणार असल्याचंही ते म्हणाले. भाजपकडून गेली पाच वर्षं दिगंबर कामत अमित शाहांना भेटल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. मात्र कामत अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. आता भाजपकडून लोबोंना लक्ष्य केलं जात आहे. हे फटिंगांचे बाप आहेत असं आरएसएसही म्हणतं असा टोला गिरीश चोडणकरांनी लगावला.

तसंच गोव्याला (Goa) कोल हब होऊ देणार नाही, असा दावाही गिरीश चोडणकर यांनी केला आहे. आम्हाला अदानी अंबानी पैसे पुरवत नाहीत, त्यामुळे गोव्याला कोल हब होऊ देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं चोडणकर म्हणाले. युक्रेनमधील भारतीयांना बाहेर काढण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असून पंतप्रधान केवळ भाषण देत फिरत आहेत, असा निशाणाही त्यांनी साधला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT