RSS meeting In goa Dainik Gomantak
गोवा

Mohan Bhagwat : भाजप सत्तेसाठी भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतो... सरसंघचालक कडाडले

राजकीय सत्तेपेक्षा तळागाळातील लोकांसाठी काम करा : मोहन भागवत

गोमन्तक डिजिटल टीम

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पणजीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे शक्तीप्रदर्शन करून गोव्यातून संघ संपलेला नाही, तर तो पुन्हा झेप घेऊ शकतो हे दाखवून दिले. मोठ्या संख्येने संघ कार्यकर्ते उपस्थित असलेल्या सभेत मोहन भागवत यांनी राजकीय नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या व भाजपा जरी सत्तेवर येण्यासाठी भ्रष्ट नेत्यांना पावन करून घेत असला, तरी या नेत्यांना शिस्तीने व प्रामाणिकपणे काम करावे लागेल असा नवा मंत्र त्यांनी दिला.

‘तुम्ही किती संपत्ती जमा केली, तुम्ही राजकारणात किती सामर्थ्यशाली झालात हे महत्त्वाचे नाही. तुम्ही तळागाळातील लोकांसाठी त्या संपत्तीचा - सामर्थ्याचा उपयोग केला का? त्यांचा विकास केला का? हे महत्त्वाचे आहे,’ असे सरसंघचालक म्हणाले.

ते म्हणाले, ‘सामर्थ्यशाली देशाकडे बघितले, तर त्याच्या यशाचे श्रेय कोणाला कोणाला मिळाले आहे. जसा समाज आहे, तसे त्या त्या देशाला नेते मिळाले आहेत. जशी प्रजा तसा राजा हा नियम, आमची भाषा, पेहराव भिन्न असले, तरी आपण सगळे एक आहोत, असे त्यांनी जाहीर केले.

२०२५ ला संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्याची पूर्व तयारी म्हणून गोव्यातील समाजाला जागृत करण्यासाठी सरसंघचालकाचे हे जाहीर बौद्धीक आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले होते. गोव्यात पडझड झालेल्या संघाच्या या सभेसाठी गावागावांतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते. भाजपचे मंत्री संघाच्या गणवेशात आले होते. छोट्या मुलांपासून आभालवृद्ध काळी टोपी, पांढरा शर्ट व खाकी पँट या गणवेशात दिसले आणि अत्यंत शिस्तबद्धरित्या त्यांनी वैयक्तिक पद्य म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 'खो'! परप्रांतीयांचे दर स्वस्त, गोमंतकीय व्यवसाय फिका; तुलसी विवाहात फुलविक्रेते हवालदिल

IND vs AUS 3rd T20: हेड, इंग्लिश, स्टॉयनिसला बनवलं शिकार! अर्शदीप सिंहचा 'थ्री-विकेट हॉल'; जोरदार कमबॅक करत केली मोठ्या रेकॉर्डची बरोबरी VIDEO

Tim David Six: टिम डेव्हिडनं लगावला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लांब षटकार, चेंडू 100-120 मीटर नाही, तर 'इतक्या' दूर जाऊन पडला... Watch Video

Women's World Cup final 2025: "त्यांच्यावर दबाव असेल", भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचं मोठं विधान

स्वप्नील-मुक्ताचा 'रोमँटिक गोंधळ',आई-बाबा झाल्यानंतर पुढे काय होणार? 'मुंबई पुणे मुंबई ४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT