Mohan Bhagwat Dainik Gomantak
गोवा

Mohan Bhagwat: RSS सरसंघचालक मोहन भागवत गोव्यात दाखल, मंगेशीत कडेकोट बंदोबस्त

मोहन भागवत यांचे आज दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) 2 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान गोव्यात राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी आज (दि.02) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) गोव्यात दाखल झाले आहेत. या अधिवेशनात भागवत संघ परिवारातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. दरम्यान, सरसंघचालक थांबणार असलेल्या नागेशी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोहन भागवत यांचे आज दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोंडा तालुक्यातील नागेशी येथे 2 ते 7 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. संघाशी संबंधित विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका नागेशीत होतील. 05 आणि 06 जानेवारीला संघ परिवाराच्या राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक होईल. 07 जानेवारी रोजी सरसंघचालक डॉ. भागवत संघ परिवारातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

दरम्यान, सरसंघसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या होणाऱ्या बैठकीला सहकार्य दत्तात्रेय होसबाळे, विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, भारतीय मजदूर संघाचे बी सुरेंद्रन, भारतीय जनता पार्टीचे बी. एल. संतोष याशिवाय विद्याभारती, भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी या बैठकींना उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT