Curchorem: पोंटेमोळ- कुडचडेतील दरोड्याप्रकरणी दोघांना अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत

वास्को (दक्षिण गोवा) पोलिसांच्या पथकाने या घरफोडी प्रकरणाचा छडा लावला आहे.
Curchorem
CurchoremDainik Gomantak

पोंटेमोळ- कुडचडेतील दरोड्याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वास्को (दक्षिण गोवा) पोलिसांच्या पथकाने या घरफोडी प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणातील आरोपी पॉल चीमा हा सराईत गुन्हेगार असून त्याचा गोवा राज्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, तसेच या घटनेचा सूत्रधार आरोपी मुझहर शेख आणि पॉल चीमा यांनी गेल्या वर्षी डिचोली आणि नावेली येथे अशाच पद्धतीने चोरी केल्याचे समोर आले आहे.

Curchorem
Single-use Plastic Ban: सिंगल युज प्लास्टिक विक्री आणि वापरावर पणजी पालिकेचा कारवाईचा बडगा

या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, पोंटेमोळ- कुडचडेतील येथील तक्रारदाराच्या घरी (सांगे) तिच्या अज्ञात व्यक्तीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सोन्याच्या दागिन्यांसहित रोख रक्कम असा एकूण रु. 38,54,300/- चा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुप्तचर तैनात करण्यात आले होते.

Curchorem
Purple Fest: पर्पल फेस्टच्या अडचणीत वाढ, एजन्सीच्या निवड प्रक्रियेला काँग्रेसचा आक्षेप

तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या मदतीने टीमने आरोपी पॉल चीमा, (वय 29 वर्षे, सध्या रा. खोल्पेवाडी, साळ, डिचोली) या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीअंती पॉल चीमा याने गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली आणि आरोपीच्या सांगण्यावरून चोरीचा काही भाग जप्त करण्यात आला. चौकशीत या गुन्ह्यामागचा मुख्य सूत्रधार मुझहर शेख, (रा.वास्को) ज्याने आरोपी पॉल चीमा याच्यासोबत वरील चोरीचा कट रचला. त्याने पॉल चीमाला गुन्ह्यादरम्यान वापरण्यासाठी काही उपकरणे दिली होती. तसेच घराची रेकी करण्यास मदत केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com