Investment Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Investment Scam: जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 2.90 कोटींचा गंडा, बायो इस्टेट सोल्सुशन्स कंपनीविरुद्ध गुन्हा

Bio Estate Solutions fraud: गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना २.९० कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने बायो इस्टेट सोल्युशन्स कंपनी व त्याच्या ६ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Sameer Amunekar

पणजी: गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना २.९० कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने मुंबईस्थित म्हापसा येथील बायो इस्टेट सोल्युशन्स कंपनी व त्याच्या ६ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणीच्या तपासकामासाठी संचालकांना लवकरच समन्स पाठविले जातील, अशी माहिती कक्षाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

सांतइस्तेव इल्हास गोवा येथील व्हेनान डायस यांनी बायो इस्टेट सोल्सुशन्स कंपनीने जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मात्र, कंपनीकडे गुंतवलेल्या रक्कमेची मुदत संपल्यानंतरही ती परत केली नाही. ही रक्कम परत करण्यास कंपनीकडून टोलवाटोलवी केली जात होती.

या कंपनीकडे आणखी काही गुंतवणुकदारांनी रक्कम गुंतवणूक केली होती. त्यांनाही ही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे डायस यांनी आर्थिक गुन्हे कक्षाकडे तक्रार दाखल केली होती. कक्षाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी प्राथमिक तपास करून कंपनी व कंपनीच्या सहा संचालकांविरुद्ध फसवणूक व कटकारस्थानाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.

कंपनीच्या महाराष्ट्रातील सहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये गुलाबराव बाबूराव करंजुळे, आश्‍विनी गुलाबराव करंजुळे, आनंद नारायणदास केवलरामानी, घनश्‍याम शर्मा, शकील इस्माईल खान व शिवाजी वाळके यांचा समावेश आहे. या संचालकांनी कोणताही परवाना नसताना कंपनीची म्हापसा येथे शाखा सुरू केली.

गुंतवणुकीवर भरमसाट परतावा देण्याचे आमिष दाखवले व गुंतवणूक करण्यात आलेल्या रक्कमेतून कंपनीने तोर्से - पेडणे येथे जमीन खरेदी केली. तसेच निवृत्तिवेतन योजना, क्रिप्टो करन्सीची बायोकॉईन अशाप्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली. गुंतवणूक केलेल्यांना ही कंपनी परतावा करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक रमेश शिरोडकर तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT