Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 7 पैकी 6 गुन्ह्यांमध्ये जामीन! जमीन हडप केसचा मास्टरमाईंड रॉयसन पसार; नावेली येथे SIT ने आवळल्या मुसक्या

Land grab case: रॉयसन रॉड्रिग्ज याला विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) पोलिसांनी नावेली येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकून अटक केली.

Sameer Panditrao

पणजी: जमीन हडपप्रकरणातील मास्टरमाईंड व ७ गुन्हे दाखल असलेला रॉयसन रॉड्रिग्ज याला विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) पोलिसांनी नावेली येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकून अटक केली. ७ पैकी ६ गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाल्यानंतर तो भूमिगत झाला होता.

पोलिस त्याचा शोध घेत होते. दीड महिन्यापूर्वी नोंद झालेल्या प्रकरणात चौकशीसाठी तो हवा असताना गायब झाला होता. न्यायालयाने त्याला आज ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. संशयित रॉयसन रॉड्रिग्ज हा मूळचा मार्ना - शिवोली येथील असून त्याच्याविरुद्ध जमीन हडपप्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकात २ तर क्राईम ब्रँचमध्ये ६ गुन्हे दाखल आहेत.

या सर्व गुन्ह्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे. २८ मार्च २०२५ रोजी नवी दिल्लीस्थित विन्सेंट डिसोझा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हापसा मामलेदार कार्यालयात २९ मार्च २०२१ पूर्वी पावलिना दिनिज, रॉयसन रॉड्रिग्ज, मारियानो आंतोनिओ तेलीस, ब्रांको रॉड्रिग्ज या सर्वांनी बोगस दस्तावेज सादर करून त्यांची मालमत्ता हडप केली असल्याचे नमूद केले होते.

आसगाव गावातील सर्वे क्रमांक ७८/२ मध्ये असलेली मालमत्ता वडिलोपार्जित असून कटकारस्थान रचून संशयितांनी ती हडप केली होती. पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून घेऊन रॉयसन वगळता इतरांना अटक करून त्यांची नंतर जामिनासाठी सुटका झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT