Royal Enfield Motoverse 2023 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 24 नोव्हेंबरपासून Royal Enfield Motoverse 2023; यंदा काय असणार खास जाणून घ्या...

दोन दिवसीय महोत्सवासाठी नोंदणी सुरू

Akshay Nirmale

Royal Enfield Motoverse 2023: रॉयल एनफिल्ड मोटोवर्स 2023 इव्हेंट 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यतील वागातोर येथे होणार आहे. कंपनीने Rider Mania या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या इव्हेंटला Motoverse असे नाव दिले आहे. Royal Enfield Motoverse 2023 साठी नोंदणी सुरू झाली आहे. 3500 रुपये भरून नोंदणी करू शकता.

Royal Enfield Motoverse 2023 मध्ये काय खास आहे?

कंपनीने सांगितले की, या वर्षी कार्यक्रमात अनेक नवीन घटकांचा समावेश असेल. Royal Enfield Motoverse मध्ये एकूण 5 डायमेंशन असतील. यामध्ये Motothrill, Motosonic, Motoville, Motoshop आणि Motoreel यांचा समावेश आहे.

मोटोथ्रिल अॅक्शन-पॅक असेल आणि रायडर्सना त्यांची मर्यादा वाढवण्यास प्रोत्साहित करणारे ठिकाण आहे.

संगीत मैफल, ओपन माईक सेशन

मोटोसॉनिक संगीत मैफलही या कार्यक्रमात रंगणार आहे. यामध्ये देशभरातील विविध कलाकार सहभागी होणार आहेत. मोटोविले 'शेड बिल्ड्स'चे प्रदर्शन करणार आहे, जेथे 23 कस्टम-बिल्ड मोटरसायकल असतील.

Motoverse येथे शोकेस केलेले शॉर्टलिस्ट केलेले कस्टम-बिल्ड डिजिटल मोहिमेद्वारे क्राउडसोर्स केले जातील. एक F&B अरेना देखील असेल, ज्यामध्ये देशभरातून खाद्यपदार्थ आणले जातील. याशिवाय संगीत आणि ओपन माइक सेशनही होणार आहे.

मोटोरीलचे आकर्षण

मोटोरील हा उपक्रम या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. यात अभ्यागत साहसी ट्रॅव्हलर्स हे त्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकवतील.

जगभरातील डकार रॅली रेसर्स, रेसिंग एन्थुझियास्ट, बेस जंपर्स, चित्रपट निर्माते, गिर्यारोहक आणि इतरांचे अनुभव आणि कथा यावर्षीच्या मोटोरीलमध्ये प्रदर्शित केल्या जातील.

मोटोशॉप

या उपक्रमात सर्वात शेवटी मोटोशॉप आहे. जिथे सहभागी मोटरसायकल अॅक्सेसरीज, रायडिंग गियर, पोशाख आणि फॅशन यांची खरेदी करू शकतात. एकंदरी गोव्यात अशा पद्धतीने रॉयल एनफिल्ड मोटोव्हर्स होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT