Royal Enfield Bullet 650 Dainik Gomantak
गोवा

Royal Enfield Bullet: रॉयल एनफील्डचा नवा धमाका! रेट्रो डिझाईन आणि आधुनिक फीचर्सची कॉम्बो 'बुलेट 650'; गोव्यातील मोटोव्हर्स फेस्टिव्हलमध्ये सादर

Motoverse Goa 2025: गोव्यात सुरु असलेल्या मोटोव्हर्स फेस्टिव्हलमध्ये अखेरीस रॉयल एनफील्ड बुलेट 650 या मोटारसायकलचे भारतात अनावरण करण्यात आले.

Manish Jadhav

पणजी: रॉयल एनफील्डच्या प्रतिष्ठित मोटारसायकल 'बुलेट'च्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. गोव्यात सुरु असलेल्या मोटोव्हर्स फेस्टिव्हलमध्ये अखेरीस रॉयल एनफील्ड बुलेट 650 या मोटारसायकलचे भारतात अनावरण करण्यात आले. या दमदार बाईकची भारतीय बाजारात एन्ट्री झाल्यामुळे 650 सीसी सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डची पकड आणखी मजबूत होणार आहे. यापूर्वी, ही मोटारसायकल इटलीतील मिलान येथे आयोजित EICMA 2025 मध्ये सादर करण्यात आली होती.

कंपनीने या बाईकच्या विक्रीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी, 'बुलेट 650' 2026 च्या सुरुवातीला भारतीय बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 आणि क्लासिक या मॉडेल्सच्या किंमतीच्या मध्यात ही बाईक असल्यामुळे तिची अंदाजित किंमत सुमारे 3.40 लाख रुपये (एक्स-शोरुम) पासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.

डिझाईन, रंग आणि स्टाईल

डिझाईन आणि स्टाइलिंगच्या बाबतीत, रॉयल एनफील्ड बुलेट 650 ही 'बुलेट 350' (Bullet 350) शी बरीच मिळतीजुळती आहे, ज्यामुळे तिचे क्लासिक आणि दमदार रुप कायम राहिले आहे. खरेदीदारांसाठी यात दोन आकर्षक रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. एक- कॅनॉन ब्लॅक आणि दोन- बॅटलशिप ब्लू. या बाईकमध्ये 'टायगर-आय' पायलट लॅम्प्ससह सिग्नेचर सर्क्युलर एलईडी हेडलॅम्प, आरई बॅज आणि हाताने पेंट केलेल्या पिनस्ट्राइप्ससह टियरड्रॉप आकाराची इंधन टाकी आहे. याशिवाय, सिंगल-पीस सीट, चौकोनी मागील फेंडर आणि क्रोमचा हँडलबार या बाईकला एक खास ओळख देतात.

इंजिन आणि शक्तिशाली पॉवर

रॉयल एनफील्ड बुलेट 650 मध्ये शक्तिशाली आणि विश्वासार्ह इंजिन वापरण्यात आले आहे, जे 650 सीसी ट्विन्स मॉडेल्समध्येही वापरले जाते. यात 647.95 सीसी, ट्विन-सिलेंडर, इनलाइन, 4-स्ट्रोक एसओएचसी (SOHC) इंजिन आहे. हे इंजिन 7250 आरपीएमवर 47 बीएचपी (BHP) ची कमाल पॉवर आणि 5150 आरपीएमवर 52.3 एनएमचा टॉर्क जनरेट करते. या बाईकला 6-स्पीड कॉन्स्टंट मेश आणि वेट मल्टी-प्लेट क्लच ट्रान्समिशन देण्यात आले.

आधुनिक फीचर्स

स्टील ट्यूबलर स्पाइन फ्रेमवर आधारित असलेल्या 'बुलेट 650' मध्ये रायडरच्या सोयीसाठी काही आधुनिक फीचर्सचा समावेश आहे. यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जे ॲनालॉग स्पीडोमीटरसह इंधन पातळी, गिअर स्थिती, ट्रिप मीटर आणि सर्व्हिस रिमाइंडरची माहिती डिजिटल स्वरुपात देते. तसेच, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ॲडजस्टेबल ब्रेक/क्लच लीव्हर्स देखील उपलब्ध आहेत. बाईकचे कर्ब वजन 243 किलोग्राम आहे आणि तिची इंधन टाकीची क्षमता 14.8 लीटर आहे.

ब्रेकिंग आणि सस्पेन्शन

बाईकच्या सुरक्षिततेसाठी यात ब्रेकिंग आणि सस्पेन्शन यंत्रणा देण्यात आली आहे. ब्रेकिंगसाठी पुढील बाजूस 320 मिमी आणि मागील बाजूस 300 मिमी चे डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. सुरक्षितता वाढवण्यासाठी यात डुअल-चॅनल एबीएस प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. सस्पेन्शन सेटअपमध्ये पुढील बाजूस 43 मिमीचा टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक ॲब्जॉर्बरचा समावेश आहे. या बाईकला 19-इंच पुढील आणि 18-इंच मागील स्पोक व्हील्स असून, त्यावर ट्यूब असलेले टायर बसवलेले आहेत. एकंदरीत, रॉयल एनफील्ड बुलेट 650 ही क्लासिक स्टाईल, आधुनिक फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनचे उत्तम मिश्रण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT