Video: बुलेट प्रूफ गेट, लक्झरी टॉयलेट आणि वॉर रूम... हमासच्या 1 किमी लांब बोगद्याचा IDF कडून पर्दाफाश

Israel Hamas War: आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बोगद्याच्या आत सामान्य माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा उपलब्ध आहे. याl वातानुकूलित खोल्या, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर आणि वॉर रूम देखील सापडले आहेत.
Hamas' 1km long tunnel exposed by IDF
Hamas' 1km long tunnel exposed by IDFX, IDF
Published on
Updated on

Bullet-proof gate, luxury toilet and war room... Hamas' 1km long tunnel exposed by IDF:

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात इस्रायली लष्कराला मोठे यश मिळाले आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने दावा केला आहे की, त्यांना एक किलोमीटर लांबीचा बोगदा सापडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बोगद्याच्या आत सामान्य माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा उपलब्ध आहे.

या बोगद्यांमध्ये वातानुकूलित खोल्या, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर आणि वॉर रूम देखील सापडले आहेत. या बोगद्यांमध्ये हमासने दिवाबत्तीची पूर्ण व्यवस्था केली होती. यासोबतच असे दरवाजे सापडले आहेत ज्यावर बॉम्बस्फोटाचाही परिणाम होऊ शकत नाही.

या सगळ्यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे या एक किलोमीटर लांबीच्या बोगद्यात सुमारे 20 ओलिसांना ठेवण्यात आले होते. यापैकी काही ओलीसांची सुटका कतारच्या मध्यस्थीने झाली.

इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, सैनिकांना होल्डिंग एरियासह बारच्या मागे पाच लहान खोल्या सापडल्या.

आयडीएफने म्हटले आहे की, छापेमारीच्या वेळी बोगद्याच्या आत कोणीही ओलीस उपस्थित नव्हते. असे सांगण्यात येत आहे की, हा बोगदा दक्षिण गाझामधील खान युनिस भागात उपस्थित असलेल्या एका दहशतवाद्याच्या घराखाली सापडला होता, जो बोगद्याच्या नेटवर्कशी जोडलेला होता.

Hamas' 1km long tunnel exposed by IDF
अफगाणिस्तानमध्ये कोसळलेली Air Ambulance बिहारच्या गयामध्ये का थांबली होती? उड्डाण मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

दरम्यान, रविवारी देखील इस्रायली लष्कराने दक्षिण गाझा तसेच उत्तर गाझामध्ये मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली लष्कराच्या कारवाईत 15 पॅलेस्टिनी सैनिक ठार झाले आहेत.

हे युद्ध सुरू होऊन 100 हून अधिक दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये गाझामध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 63 हजारांहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. लाखो लोक उपासमारीने मरत आहेत. जीव वाचवण्यासाठी धावत आहेत.

Hamas' 1km long tunnel exposed by IDF
मालदीवच्या अध्यक्षांचा आडमुठेपणा; भारतीय विमान वापराला परवानगी नाकारल्याने 14 वर्षीय मुलाने गमावाला जीव

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 178 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर हवाई हल्ल्यांमध्ये 293 लोक गंभीर जखमी झाले आहेत. गाझामधील रफाहमध्ये इस्रायलने ड्रोनने कारवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे, ज्यात चार हमास सैनिक ठार झाले, तर अनेक लोक जखमी झाले.

इजिप्तला लागून असलेला रफाह हा सीमावर्ती भाग आहे. तेथे मोठ्या संख्येने पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. यासोबतच इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहच्या सैनिकांनाही ड्रोनने लक्ष्य केले आहे.

हमासच्या दहशतवाद्यांसोबतच इस्रायलच्या लष्कराने सीरियातील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डवरही हल्ले तीव्र केले आहेत. शनिवारी दमास्कसमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रिव्होल्युशनरी गार्डचे अनेक सदस्य ठार झाले. त्यांचे तळ इस्रायलने नष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com