MLA Rajesh Phaldesai And Minister Babush  Dainik Gomantak
गोवा

मोन्सेरात-फळदेसाई यांच्यातील वाद संपेना; 'बायंगिणी' कचरा प्रकल्पाचे भवितव्य अंधारात!

Bainguinim Waste Management Plant: कुंभारजुवेचे आमदार फळदेसाई यांनी काँग्रेसमध्ये असतानाही या प्रकल्पास विरोध दर्शविला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: महानगरपालिकेच्या मालकीच्या बायंगिणी येथील जागेत प्रस्तावित असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे भवितव्य अद्याप अंधारातच असल्याचे दिसत आहे. कारण सत्ताधारी गटातील मंत्री बाबूश मोन्सेरात आणि कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यात सुरू असलेल्या वादावरून बायंगिणीच्या प्रकल्पावर आता मुख्यमंत्र्यांनाच तोडगा काढवा लागणार आहे.

या प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्याने आणि न्यायालयानेही परवानगी दिल्याने तो होणारच, अशी भूमिका आमदार बाबूश मोन्सेरात यांनी घेतली आहे. तर कुंभारजुवे मतदारसंघात हा प्रकल्प येत असल्याने कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या बाजूला झालेल्या इमारतीतील नागरिकांचे 'तारणहार' बनण्याची भूमिका फळदेसाई यांनी घेतली आहे. त्यामुळे आमदार- मंत्र्यांच्या या कलगी तुऱ्यामध्ये बायंगिणी कचरा प्रकल्पाचे भिजत घोंगडे अद्याप कायम असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे, कुंभारजुवेचे आमदार फळदेसाई यांनी काँग्रेसमध्ये असतानाही या प्रकल्पास विरोध दर्शविला होता. भाजपमध्ये आल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आता आमदार- मंत्र्यांच्या या वादामुळे बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे होणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प

हा प्रकल्प झाल्यास तिसवाडीतील पाच आणि फोंडा तालुक्यातील काही मतदारसंघांतील कचराही या प्रकल्पात प्रक्रिया करण्यासाठी आणण्याची क्षमता त्यात असणार आहे. त्यामुळे मोन्सेरात यांच्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो जर त्यांच्या कारकिर्दीत मार्गी लागला नाही तर २०२७ मध्ये पणजीतून विधानसभेसाठी उभे राहण्याविषयी त्यांना शंभरवेळा विचार करावा लागणार आहे.

पायाभरणीसाठी मुहूर्त मिळेना

गेल्या चार वर्षांपासून बायंगिणी प्रकल्पाची पायाभरणी करण्यासाठी महानगरपालिकेला फळदेसाईंच्या विरोधामुळे मुहूर्त मिळेनासा झाला आहे. केवळ प्रकल्प होणार म्हणून भूमिका घेत नागरिकांची भलावण करण्यात मोन्सेरात यांनी तीन वर्षे काढली. कचरा व्यवस्थापन खातेही त्यांच्याकडे असल्याने बायंगिणीत कचरा प्रकल्प उभारला जाईल, अशी आशा पणजीकरांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

SCROLL FOR NEXT