Road Safety Week Gomantak Digital Team
गोवा

Road Safety Week in Goa: काही जबाबदारी पालिकांना द्यावी

गोमन्तक डिजिटल टीम

Road Safety Week in Goa: आज(ता.१५)पासून संयुक्त राष्ट्र पुरस्कृत जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताहाची सुरवात झाली. हा सप्ताह रविवार, 21 मे रोजीपर्यंत चालू राहणार आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त गोवा कॅनतर्फे पादचारी व वाहनचालकांसाठी आयोजित केलेल्या जागृती मोहिमेला मडगावातून प्रारंभ झाला.

त्यावेळी झेब्रा क्रॉसिंग किंवा गतिरोधकांवरील पांढरा रंग काढणे तसेच रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या रंगाची पट्टी ओढणे यासारखी कामे सार्वजनिक बांधकाम खात्याऐवजी नगरपालिकांकडे सोपवावीत, अशी सूचना यावेळी गोवा कॅनचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी केली.

रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले की, या सप्ताहात पादचारी व वाहनचालकांना रस्त्यासंदर्भातील सर्व महत्त्वाचे नियम समजावून सांगितले जातील. शिवाय वेगमर्यादा, आयएसआय मार्क असलेल्याच हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनचालकांसाठी सीटबेल्ट, पार्किंगमध्ये शिस्त, गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंगवरील वागणूक याबद्दलची माहिती देण्यात येत आहे.

मोहिमेला चांगला प्रतिसाद

मडगावमधील जागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. गोवा कॅनच्या कार्यकर्त्यांनी पादचाऱ्यांना व वाहनचालकांना सतर्क करणाऱ्या सूचना लिहिलेले फलक गळ्यामध्ये घातले होते. वाहतूक पोलिसांकडूनही यावेळी चांगले सहकार्य लाभले. आता ही जागृती मोहीम पर्वरी, पणजी, म्हापसा, वास्को या शहरांमध्येही आयोजित केली जाईल.

वाहनचालकांनी पादचाऱ्यांना व खासकरून ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. यासंदर्भातील जागृतीही केली जात आहे. बाजार परिसर किंवा गर्दी असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त तासी ३० किमी वेग ठेवण्याचे भानही वाहनचालकांनी राखणे आवश्यक आहे.

रोलंड मार्टिन्स, गोवा कॅनचे निमंत्रक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT