Panjim Mayor Election Dainik Gomantak
गोवा

पणजीच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात, तर उपमहापौरपदी संजीव नाईक

पणजीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजी महापालिकेच्या महापौरपदी बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांची बिनविरोध निवड झाली आहे. पणजीच्या महापौरपदासाठी बुधवारी निवडणूक झाली, यात रोहित मोन्सेरात यांचा एकच अर्ज दाखल असल्याने त्यांनी सलग दुसऱ्यावेळी पणजीचा महापौर होण्याचा मान मिळाला आहे. (Rohit Monserratte News Updates)

पणजी (Panjim) महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज बुधवारी 30 मार्च रोजी निवडणूक झाली. यात महापौरपदी रोहित मोन्सेरात, तर उपमहापौरपदी संजीव नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे. केवळ एकच अर्ज आल्याने रोहित मोन्सेरात यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणाच बाकी होती.

पणजी महापालिकेचे उपमहापौर वसंत आगशीकर यांनी अर्ज दाखल केला नाही. मात्र त्यांच्या जागी संजीव नाईक यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज केला होता. ही निवडणूक (Election) जिंकत मोन्सेरात कुटुंबाने पणजीवर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. आमदार बाबूश मोन्सेरात समर्थक गटाकडे 25 नगरसेवक, तर विरोधी नगरसेवकांची संख्या फक्त 5 आहे. बाबूश मोन्सेरात (Babush Monserratte) यांचा गोव्याच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता बाबूश यांना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT