Rohit Kadam Chief Officer Madgaon Municipality  
गोवा

मडगाव पालिकेत ‘एजंटां’ना मज्जाव

मुख्याधिकारी रोहित कदम यांचा आदेश; एजंटांसह कर्मचाऱ्यांचं धाबं दणाणलं

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी त्या दिशेने पहिले पाऊल म्हणून नवे मुख्याधिकारी रोहित कदम यांनी पालिकेच्या दैनंदिन व्यवहारात हस्तक्षेप करणाऱ्या तमाम एजंटांना नगरपालिकेत मज्जाव केला आहे.

त्यांनी या संदर्भातील एक नोटिस पालिकेच्या सर्व विभागात पाठविली असून अशा कोणाही एजंटाला विभागात दाखल करून घेऊ नये, असे बजावले आहे, त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होईल असा इशारा दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या नव्या आदेशामुळे एजंटांसह कर्मचाऱ्यांचंही धाबं दणाणलं आहे.

पालिकेचा एक पर्यवेक्षक कार्यालयातील एका टेबलावर बसून काम करत असल्याचे नगरसेवक सदानंद नाईक यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले व त्याला हरकत घेतली असता मुख्याधिकारी म्हणाले, पालिकेची थकबाकी वीस कोटीवर पोचली आहे, पण ती वसूल करावयाची झाली, तर व्यवस्थित आकडेवारी नाही. मडगाव पालिकेकडे कुशल व कार्यक्षम कर्मचारी नाही व म्हणून सदर पर्यवेक्षकाला आपण तेथे बसवून थकबाकीची व्यवस्थित माहिती तयार करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT