Rohan Khaunte social media statement Dainik Gomantak
गोवा

मुलांना सोशल मीडिया निर्बंध गरजेचे, करिअरसाठी 'एआय' शिकण्यास प्राधान्य द्यावे- मंत्री रोहन खंवटे

Rohan Khaunte social media statement: मुले मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आणि गेमिंगच्या आहारी जात असून त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मुले मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आणि गेमिंगच्या आहारी जात असून त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. फोन वापरू न दिल्याने आत्महत्येसारखे प्रकार किंवा पालकांवर दबाव आणण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया व गेमिंग ॲप वापरावर पूर्ण बंदीऐवजी काही प्रमाणात निर्बंध घालणे गरजेचे आहे, असे मत माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

मुलांनी सोशल मीडिया व गेमिंगऐवजी शैक्षणिक साधने, एआय आणि नवतंत्रज्ञान शिकण्यास वेळ द्यावाा. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी त्यांच्या वेळेचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असे ते म्‍हणाले.

केंद्रीय मंत्र्यांशी करणार चर्चा

सोशल मीडिया आणि गेमिंगवरील निर्बंधाबाबतचे आपले विचार केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे कळविले आहेत. दिल्ली दौऱ्यात त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असून, सोशल मीडिया निर्बंधाच्या महत्त्वावर भर देणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

एका अहवालानुसार भारतातील मुले दररोज सुमारे दोन ते सव्वादोन तास स्क्रीनवर घालवतात. जगातील अनेक देशांनी मुलांना सोशल मीडियावर निर्बंध घातले आहेत, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT