Rohan Khaunte : दोन दिवसांच्या चिंतन शिबिरात झालेल्या चर्चेचा गोव्याच्या पर्यटन वृद्धीसाठी बराच फायदा होणार, असे मत पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खवंटे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, या बैठकी दरम्यान आध्यात्मिक आणि हेरिटेज पर्यटन सर्किट्सच्या राष्ट्रव्यापी नेटवर्कशी जोडून गोव्याच्या पर्यटनाच्या शक्यता वाढविण्यावर चर्चा केली, लोक प्रशासनातील आयटी सक्षम सेवांची व्यापकता वाढविण्यावर आणि गोव्यातील पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय तंत्राचा उपयोग कसा करता येणे शक्य आहे त्यावरही व्यापक चर्चा झाली.
या शिबिराने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने गोव्याचा विकास वाढविण्यासाठी उजळ दृष्टिकोन पुढे आणला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिरावर आपले मत व्यक्त करताना मंत्री खवंटे यांनी शनिवारी सांगितले की, या शिबिराने गोव्यातील पर्यटन आणि आयटी प्रकल्पांना केंद्रीय नियोजनाशी जोडण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पनांवर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत विचारमंथन करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
"चिंतन शिबिरामुळे माझ्या सहकाऱ्यांसोबत गोव्यातील पर्यटन आणि आयटी प्रकल्पांना केंद्रीय नियोजनाशी जोडण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले, ज्याची कल्पना पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारने केलेल्या केंद्र-राज्य विकासामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी उपयोगी ठरेल."
- रोहन खंवटे, पर्यटन व माहिती तंत्रज्ञानमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.