Goa Tourism Minister Rohan Khaunte on Saturday met Union Tourism Minister Gajendra Singh Shekhawat  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'गोव्याशी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवा', खवंटेची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

Manish Jadhav

राज्याचे पर्यटनमंत्री रोहण खवंटे यांनी शनिवारी (10 ऑगस्ट) दिल्ली दौऱ्यात केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. या भेटीत खवंटे यांनी केंद्रीय मंत्र्यांशी अनेक मुद्यावर वार्तालाप केला. किनारी (Goa) राज्याशी आंतरराष्ट्रीय कनेक्टीव्हिटी वाढण्यासह विविध मुद्यांवर चर्चा केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पर्यटन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खवंटे यांनी प्रमुख टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून गोव्याला प्रसिद्ध मिळवून देण्यावर भर दिला. याशिवाय, त्यांनी गोव्याला थेट आंतरराष्ट्रीय प्लाइट्स वाढवणे आणि प्रमुख शहरांशी कनेक्टीव्हिटी सुधारणे यावरही भर दिला. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, त्यांच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू गोव्याशी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवणे हा होता, जो अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक आहे.

याशिवाय, गोव्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रमुख वारसा स्थळांपैकी एक असलेल्या बॅसिलिका ऑफ बॉम जीझससाठी केंद्राच्या 'प्रसाद' (PRASHAD, Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive) योजनेला गती देण्याची विनंतीही यावेळी पर्यटनमंत्री खवंटे यांनी शेखावत यांच्याकडे केली.

“दोन्ही मंत्र्यांनी जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून गोव्याचा दर्जा उंचावण्यासाठी सहयोगी प्रयत्नांचे महत्त्व मान्य केले आहे. केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी गोव्याला केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे राज्याला आगामी पर्यटन उपक्रमांचा जास्तीत जास्त फायदा होईल,” असे पर्यटन विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT