Chimbel unity Mall Dainik Gomantak
गोवा

Chimbel: '..दोन्‍ही प्रकल्‍प चिंबलमध्‍ये येऊ देणार नाही'! नागरिक ठाम; पर्यटनमंत्री खंवटेंची जमिनींवर नजर असल्याचा आरोप

Chimbel unity Mall: परवाने न घेता या प्रकल्‍पांचे काम सुरू करण्‍याची तयारी त्‍यांच्‍याकडून सुरू आहे, परंतु, मंत्री खंवटे यांची ही हेकेखोरी आम्‍ही खपवून घेणार नाही, असे शिरोडकर म्‍हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मंत्री रोहन खंवटे यांची चिंबलमधील जमिनीवर नजर असल्‍यामुळेच प्रत्‍येक प्रकल्‍प ते चिंबलमध्‍ये आणू पाहात आहेत. चिंबलमधील तोयार तळे दलदलीचा प्रदेश म्‍हणून अधिसूचित असतानाही तेथे प्रशासनातर्फे स्‍तंभ आणि युनिटी मॉल उभारण्‍याचा निर्णय घेण्‍यात येत आहे, परंतु आम्‍ही हे दोन्‍ही प्रकल्‍प चिंबलमध्‍ये येऊ देणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिरोडकर यांनी दिला.

पणजीत शनिवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिंबलमधील स्‍थानिक नागरिक त्‍यांच्‍यासोबत होते. यापूर्वी चिंबलवासीयांनी ‘आयटी पार्क’ला विरोध केलेला होता. तरीही सरकारने आता कदंब पठारावर ‘प्रशासन स्‍तंभ’ आणि ‘युनिटी मॉल’ हे दोन प्रकल्‍प उभारण्‍याच्‍या दिशेने हालचाली सुरू केलेल्‍या आहेत.

या प्रकल्‍पांची माहिती मिळताच ग्रामसभेतही स्‍थानिकांनी या प्रकल्‍पांना विरोध दर्शवला. चिंबलमधील ज्‍या ठिकाणी सरकार हे प्रकल्‍प आणू इच्‍छित आहेत. त्‍या ठिकाणी तोयार तळे आहे. हे तळे केंद्र सरकारने दलदलीचा प्रदेश म्‍हणून अधिसूचित केलेले आहे.

तरीही या तळ्याच्‍या बाजूला हे प्रकल्‍प उभारण्‍यात येणार असल्‍याचे मंत्री खंवटे सांगत आहेत. पंचायतीचे परवाने न घेता या प्रकल्‍पांचे काम सुरू करण्‍याची तयारी त्‍यांच्‍याकडून सुरू आहे, परंतु, मंत्री खंवटे यांची ही हेकेखोरी आम्‍ही खपवून घेणार नाही, असे शिरोडकर म्‍हणाले.

‘रुडॉल्‍फ फर्नांडिस मूग गिळून गप्‍प’

‘प्रशासन स्‍तंभ’ आणि ‘युनिटी मॉल’मुळे चिंबलमधील तोयार तळे उद्‍ध्वस्‍त होऊन पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार असल्‍याचे माहीत असतानाही सांताक्रूझचे आमदार रुडॉल्‍फ फर्नांडिस मात्र मुग गिळून गप्‍प बसले आहेत, अशी टीका गोविंद शिरोडकर यांनी केली. उपस्‍थित नागरिकांनीही यावेळी या दोन्‍ही प्रकल्‍पांना तीव्र विरोध दर्शवला.

बफरझोन निश्‍चितीसाठी प्राधिकरणाला पत्र

तोयार तळ्याचा बफरझोन निश्‍चित करण्‍याची मागणी आम्‍ही गेल्‍या अनेक वर्षांपासून वेटलँड प्राधिकरणाकडे करीत आहोत, परंतु प्राधिकरणाकडून आमची मागणी अद्याप मान्‍य झालेली नाही. त्‍यासाठी आम्‍ही पुन्‍हा एकदा प्राधिकरणाला पत्र पाठवलेले आहे. अशा दलदलीच्‍या जागेत सरकार ‘प्रशासन स्‍तंभ’ची १७ मजली इमारत कशी उभारणार? असा सवालही गोविंद शिरोडकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT