
पणजी: चिंबल गावातील सर्व्हे क्रमांक ४० मधील ऐतिहासिक तलावाला जोडणाऱ्या जमिनीवर युनिटी मॉल बांधण्याच्या प्रस्तावित बांधकामाला चिंबल ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प जलस्रोत आणि जलचर दोघांनाही धोका निर्माण करण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच आमचा त्यास विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
२०१८ मध्ये आयटी पार्कसाठी मूळतः निश्चित केलेल्या या जागेला तीव्र विरोध झाला होता आणि सरकारने उच्च न्यायालयात ते पुढे जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर ते स्थगित करण्यात आले होते. आता कुंपण आणि इतर सुरुवातीचे काम आधीच सुरू असल्याने, त्याठिकाणी २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रॅली काढून निदर्शने केली जाणार आहेत.
नागरिकांनी ‘तलाव नष्ट होण्यापूर्वी‘ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.आयटी पार्क आधीच ग्रामस्थांनी नाकारला होता. आम्ही हा मॉल देखील नाकारू.
पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात योजना आखत असलेले जैवविविध समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी आपला त्याविरोधात संघर्ष सुरूच राहील, असे निक्षून सांगितले. येथील तलाव ऐतिहासिक आहे. पिढ्यानपिढ्या, आदिवासी समुदाय शेतीसाठी आणि वर्षभर दैनंदिन पाण्यासाठी त्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत, असेही ते म्हणाले.
प्रस्तावित १७ मजली प्रशासकीय संकुलासह मोठ्या प्रमाणात बांधकामे जलचर नष्ट करू शकतात आणि सांडपाण्याने तलाव प्रदूषित करू शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. जलचर फक्त दोन मीटर खोलात आहेत. जर तुम्ही ५ किंवा १७ मजली इमारतीसाठी खोदकाम केले तर तलाव नष्ट होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. या प्रकल्पास पंचायतीची मंजुरी असली तरी गावकऱ्यांशी मंडळाने त्याविषयी कधीही सल्लामसलत केली नाही, असेही शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.