Robbery in Train Dainik Gomantak
गोवा

Robbery in Train: रेल्वेमधून 4.25 कोटींचे सोने लंपास

प्रवासी साखरझोपेत असताना काणकोण क्रॉसिंगवर पळवला ऐवज

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News मुंबईहून केरळला सोन्याचे दागिने घेऊन जाणाऱ्या एका सराफाला आज, मंगळवारी पहाटे धसका बसला. 4.25 कोटींचे दागिने असलेली बॅग प्रवासी साखरझोपेत असताना अज्ञाताने चोरून नेले. ही घटना काणकोण क्रॉसिंगवर ट्रेन थांबलेली असताना पहाटे 3 च्या सुमारास घडली.

कोकण रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुजरातहून केरळला जाणाऱ्या गांधीधाम हमसफर एक्सप्रेसमध्ये घडली.

मूळ केरळ येथील आशोक आर हे सध्या पनवेल-मुंबई येथे राहणारे सराफ हे दागिने घेऊन केरळला निघाले होते. त्यांनी सोने असलेली ही बॅग खाली लॉक करून ते वरच्या बर्थवर झोपी गेले.

पहाटे तीनच्या सुमारास पटरी बदलण्यासाठी ट्रेन काणकोण क्रॉसिंगवर थांबलेली असताना या बॅगला लावलेली साखळी कापून ती अज्ञाताने पळवली.

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती कोकण रेल्वे पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली.

हा सराफ अशाप्रकारे नियमित ट्रेनमधून सोन्याची ने-आण करायचा. कुणाला तरी त्याची माहिती होती. त्याच्या मागावर राहून ही चोरी केली असावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

...अन् रिकामी बॅग सापडली

कुणी तरी ही बॅग घेऊन जात असल्याचे खालच्या बर्थवर झोपलेल्या प्रवाशाने पाहिल्यावर त्याने अशोक यांना उठविले. त्यांनी बॅगेची शोधाशोध केली; पण सापडली नाही. गाडी काणकोण रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी रेल्वे मार्गावर जाऊन तपासणी केली असता, ज्या जागेवर ट्रेन थांबली होती, तिथून काही अंतरावर फोडलेल्या अवस्थेत रिकामी बॅग त्यांना आढळून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT