Robbery in Curti Ponda Dainik Gomantak
गोवा

कुर्टीत दिवसाढवळ्या फ्लॅट फोडल्याने खळबळ

दहा लाखांचे दागिने लंपास; परिसरात भीती, गस्त हवी

दैनिक गोमन्तक

फोंडा : कुर्टी - फोंडा येथील न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनीत फ्लॅट फोडून चोरट्यांनी दहा लाख रुपये किमतीचे दागिने पळवण्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. दिवसाढवळ्या तेही केवळ दोन तासांच्या आत ही धाडसी चोरी भर लोकवस्तीत झाल्याने फोंडा पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान ठाकले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्टी न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणाऱ्या नरसिंह नाईक यांच्या घरी ही चोरी झाली आहे. चोरीची घटना घडली त्यावेळेला फ्लॅटमध्ये कुणीच नव्हते. नरसिंह नाईक हे कुर्टी पंचायत कार्यालयात जाण्यासाठी सकाळी दहा वाजता बाहेर पडले आणि लगेच दुपारी घरी परतले. फक्त दोन तासांसाठी नरसिंह नाईक घराबाहेर असल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधली. नरसिंह नाईक यांची पत्नी तसेच दोन्ही मुलंगे कामानिमित घराबाहेर होते. त्यामुळे नाईक कुटुंबियांवर पाळत ठेवूनच ही चोरी झाली आहे.

लग्नाचा सिझन असल्याने नाईक कुटुंबियांनी दागिने कपाटात ठेवले होते. याशिवाय नरसिंह नाईक यांच्या सासुरवाडीत घराचे काम चालल्याने त्यांनीही आपले दागिने सुरक्षेसाठी नाईक यांच्याकडे ठेवले होते. चोरलेल्या दागिन्यात बांगड्या, सोनसाखळी व इतर दागिन्यांचा समावेश आहे

फोंडा पोलिसांना या चोरीची माहिती देताच त्यांनी घटना स्थळी धाव घेऊन तपासकाम सुरू केले. तपासासाठी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पण ठोस असे काही मिळू शकले नाही.

कुर्टी भागात चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी या भागाचे पंचसदस्य शैलेश शेट व इतर रहिवाशांनी केली आहे. एखाद्या संशयास्पद व्यक्तींची कसून चौकशी करण्याची ही मागणी करण्यात आली आहे.

चोरी करण्यासाठी चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडली. ही कडी तोडण्यासाठी कटरचा वापर केला की छन्नी हातोड्याचा ते स्पष्ट झालेले नाही. चोरट्यांनी आत जाऊन कपाट फोडून आतील दागिने पळवले चोरी झालेला फ्लॅट हां दुसऱ्या मजल्यावर आहे, चोरी झाली त्यावेळी समोरचा तसेच खालचे फ्लॅट बंद होते. चोरी दोघानी केली असावी असाही कयास व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT