Accused Police Caught Dainik Gomantak
गोवा

Shooting At Vasco : अखेर सुगावा लागला; झुआरीनगर दरोड्याचा प्रयत्न, पोलिसांवर गोळीबार प्रकरणी दिल्लीतून एकाला अटक

संशयिताला विमानामार्गे आणले गोव्यात

Rajat Sawant

झुआरीनगर-वास्को येथील एमईएस महाविद्यालय परिसरातील एका बंगल्यात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या व पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तीन चोरट्यांपैकी एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी विमानामार्गे संशयिताला गोव्यात आणले.

चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार झाल्‍याने राज्‍यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री दोनच्‍या सुमारास घडली होती. घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. याच तिन्‍ही चोरट्यांनी तीन दिवसांत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करून अक्षरश: धुमाकूळ घातला.

झुआरीनगर-वास्को येथील एमईएस महाविद्यालय परिसरातील बंगल्‍यात मध्‍यरात्री चोरटे घुसले होते. याबाबतची माहिती मिळताच वास्को पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्‍याचे कळताच चोरटे घाबरले आणि त्‍यांनी तेथून पळ काढला. मात्र पळून जाताना त्‍यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. 

याप्रकरणी वास्को व वेर्णा पोलिसांकडून चोरट्यांचा कसून तपास सुरू होता. पोलिसांना तिघा चोरट्यांमधील एका संशयिताला दिल्लीत पकडण्यात यश आले. विमानामार्गे संशयिताला गोव्यात आणण्यात आले. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT