Goa: People in Vasco suffer due to water logging on the streets Dainik Gomantak
गोवा

Goa: नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे वास्कोतील रस्ते पाण्याखाली

नगरपालिकेच्या (Municipality) 'अपूर्ण कामगारांच्या' कारणावर वास्कोतील (Vasco) नागरिक संतापले.

दैनिक गोमन्तक

गोवा(Goa) राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली(Roads under water) गेले आहेत. यात वास्को (Vasco) शहरातील रस्त्यांची परिस्थितीही तशीच आहे. काही भागात पालिकेची मान्सूनपूर्व कामे वेळेवर न झाल्याने पावसाळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे, याचा फटका गोव्याच्या जनतेला बसत आहे. राज्यात गेले पाच दिवस मुसळधार तसेच रिपरिप पाऊस चालू आहे. त्यामुळे वास्कोतील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडणे, घरांच्या भिंती कोसळणे सारखे पडझडीचे प्रकार घडले. दरम्यान यंदा वास्को नगरपालिकेतर्फे (Municipality) होणारी कामे ही कामगारां अभावी तसेच मान्सूनपूर्व पालिका मंडळ स्थापन न झाल्याने रेंगाळली होती. त्यामुळे पहिल्या पावसातच रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार घडले. पालिकेकडे कामगार वर्ग नसल्याने मान्सूनपूर्व कामे रेंगाळली गेली असल्याचे कारण पालिकेकडून पुढे करण्यात आले. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार पालिकेने पुढे केलेले कारण साफ चुकीचे असून पालिकेकडे पुरेसे सफाई कर्मचारी आहेत, परंतु त्या कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाहिये, तसेच काही कर्मचारी गटार साफ करण्याची कामे करण्यास राजी होत नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यानच्या काळात दारोदारी कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाच्या रोजंदारीवर काम करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. मात्र त्यांनी गटार साफ करण्यास नकार दिला होता. फक्त शहरातील मुख्य रस्त्यावरील गटार आणि तो देखील त्यांनी वरच्यावर साफ करून सदर कामगारांनी आपली अर्ध्या दिवसाची हजेरी भरली होती. वास्को नगरपालिकेच्या अश्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील काही भागातील रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे वाहनचालक तसेच पादचार्‍यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान वास्को शहरातील भाजी मंडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून या पाण्यातून वाहनचालकांना तसेच पादचार्‍यांना वाट काढताना प्रचंड प्रमाणात फरफट करावी लागते. तसेच सेंट अँड्रू चर्च जवळील ओझलर फोरम इमारतीसमोर, तानिया हॉटेल समोर उड्डाण पुलाखाली, देस्तेरो वाड्या शेजारी मुख्य रस्त्यावर, बायणा उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या भागात पूरस्थितीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचारी वैफल्यग्रस्त झाले आहेत.अश्या ठिकाणी पालिका कर्मचारी तसेच अधिकारी येथे फिरकायला बघत नसल्याने या ठिकाणाची पूरस्थिती ' जैसे थे ' आहे आहे. यावर लक्ष देण्याची घालण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. नवेवाडे, मुरगाव, सडा, मांगुरहिल, दाबोळीचा काही भाग डोंगराळ असल्याने या भागातील पाणी सखल भागात येत आहे व सखल भागात पूरस्थिती निर्माण होत आहे.

फक्त येथील ' हॉटेल एचक्यू ' समोरील रस्ता अपवाद ठरला, नाहीतर दरवर्षी हा रस्ता देखील पाण्याखाली जाऊन तेथे तळ्याचे स्वरूप निर्माण व्हायचे. मात्र माजी नगरसेवक दाजी साळकर यांनी गेल्या वर्षी या ठिकाणच्या गटारांचे बांधकाम करून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करून ' स्वतंत्र पथ ' मार्गावरील पावसाच्या पाण्याची समस्या सोडवली होती. तसेच एफ एल गोम्स मार्गावर व टिळक मैदानासमोरील वळणावर होणाऱ्या पावसाच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी गटारांची साफ - सफाई केल्याने इथला ही प्रश्न मिटला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT