Goa: डिचोलीत पावसाचा रौद्रावतार, पुराचा धोका ?

पावसाचा कहर चालूच असून, आज (बुधवारी) सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने डिचोलीत (Bicholim) सर्वत्र थैमान घातले.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पावसाचा कहर चालूच असून, आज (बुधवारी) सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने डिचोलीत (Bicholim) सर्वत्र थैमान घातले. कोसळधार पावसामुळे डिचोलीसह साखळीतील वाळवंटीसह अन्य नद्यांची पातळी धोक्यापर्यंत पोचली आहे. अस्नोड्यातील पार नदी फुटून पाणी मुळगावमधील सखल भागात घुसले आहे. शापोरा नदीही ओसंडून वाहत आहे. आकाशात दाटलेले ढग पाहता पावसाचा जोर वाढतच राहिल्यास नदीकाठी पुराचा तडाखा बसण्याचा धोका आहे. या शक्यतेने डिचोली, साखळी शहरासह साळ आदी सखल भागातील लोकांत धडकी भरली आहे. दरम्यान, पावसामुळे सुर्ल आणि डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात चोडण येथे मिळून दोन ठिकाणी घरांवर झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलाकडून आहे.

Bicholim
Goa: डिचोली शांतादुर्गा विद्यालयाच्या दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

मागील दोन दिवसांप्रमाणेच आजही (बुधवारी) दिवसभर संतत आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. दिवसभरच्या पर्जन्यवृष्टीमुळे आजही डिचोलीत सर्वत्र हा:हाकार माजला. मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांचे पाणी वाढत असून, सायंकाळनंतर डिचोली नदीसह साखळीतील वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास डिचोलीतील विशेष करून सखल भाग पुराच्या विळख्यात येण्याची भिती आहे.

Bicholim
Goa: पर्यटन क्षेत्राला लवकरच चालना; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

बुधवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. अधूनमधून पावसाचा रौद्रावतार अनुभवायला मिळाला. सायंकाळी उशिरापर्यंत कोसळधार सुरूच होती. त्यातच आकाशात ढगांची दाटी कायम असल्याने रात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्याने आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून, पम्पिंगव्दारे डिचोली आणि साखळी नदीकाठच्या पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Siolim Woman Investment Fraud
Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com