गोव्यातील (Goa) खराब रस्त्यांवर जरा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही लक्ष द्यावे  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील रस्त्यांची नितीन गडकरी यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज

राष्ट्रीय आकडेवारी प्रमाणे गोव्यातील (Goa) एक तृतीयांश अपघात (Accident) खराब रस्त्यांमुळे होत असल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील (Goa) सर्व रस्ते 1 नोव्हेंबर पर्यंत खड्डेमुक्त होतील ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा फुसकी ठरल्यानंतर सरकारवर चहूबाजुंनी टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूलचे (Trinamool) राजेंद्र काकोडकर (Rajendra Kakodkar) गोव्यातील खराब रस्त्यांवर जरा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.

गडकरी सध्या गोव्याच्या भेटीवर असून त्यांनी फक्त उद्घाटने करण्यातच मग्न न राहता गोव्यातील रस्त्याची दुर्दशा पहावी आणि नंतर गोवा सरकारातील मंत्र्यांचे कानही पिळावेत अशी मागणी काकोडकर यांनी केली.

राष्ट्रीय आकडेवारी प्रमाणे गोव्यातील एक तृतीयांश अपघात खराब रस्त्यांमुळे होत असल्याचे दिसून आले आहे. 2019 या वर्षी खराब रस्त्यांमुळे गोव्यात 1160 अपघात होऊन 66 जणांना मृत्यू आला. ही बाब अत्यंत गंभीर असून केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT