Assagao Road Repair Dainik Gomantak
गोवा

Assagao Road: आसगावात युद्धपातळीवर रस्त्यांची डागडुजी सुरू!

Assagao Road Repair: रस्त्यांच्या दुरावस्थेवर स्थानिक पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला होता

गोमन्तक डिजिटल टीम

शिवोली: आसगाव येथील खासगी बस मालकांनी येथील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आक्रोश आंदोलन करून आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर या भागातील मुख्य रस्त्याच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर आज (सोमवारी) हाती घेण्यात आले.

दरम्यान, या भागातील खासगी बसमालक, कंडक्टर्स तसेच चालकांनी शनिवारी एकत्रित येऊन भर रस्त्यात साचलेल्या पाण्यात बसून आक्रोश आंदोलन छेडले होते, यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम देऊन बसमालक श्‍याम गोवेकर व इतरांनी स्थानिक पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, आसगावचे सरपंच हनुमंत नाईक तसेच शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी याबाबतीत तात्काळ पावले उचलून संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना येथील खड्डेमय रस्त्यांची डागडुजी त्वरित सुरू करा, असे आदेश दिले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रस्त्याच्या दुरावस्थेवरून सरकारला उपोषणाचा इशारा दिलेल्या बस मालक श्‍याम गोवेकर यांनी रस्ता डागडुजीच्या काम स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT