Assagao: खड्ड्यांतील पाण्यात बसचालकांचा ठिय्या! आमरण उपोषणाचा इशारा

Goa Roads: रस्त्यांतून खड्डे की खड्ड्यातून रस्ता अशा संभ्रमावस्थेत बसचालकांना बसगाड्या हाकाव्या लागत आहेत
Goa Roads: रस्त्यांतून खड्डे की खड्ड्यातून रस्ता अशा संभ्रमावस्थेत बसचालकांना बसगाड्या हाकाव्या लागत आहेत
Assagao Road PotolesDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: यंदाच्या पावसात आसगाव येथील मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आठ दिवसांत येथील रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी अन्यथा आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा बसमालक श्याम गोवेकर यांनी दिला आहे. आसगाव पंचायत कार्यालयासमोर श्याम गोवेकर तसेच इतरांनी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

आसगाव ते म्हापसा व परत प्रवासासाठी या भागातून मोजक्याच बसेस धावतात व ग्रामस्थांचा प्रवासाचा मोठा भार उचलतात. एक दोन कदंब बसेसही साथीला असतात. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून या भागातील आसगाव ते बादे (चाररस्ता) येथील रस्त्याची धुळधाण झालेली असून जागोजागी रस्ता खड्डेमय बनला आहे.

सध्या या भागात रस्त्यांतून खड्डे की खड्ड्यातून रस्ता अशा संभ्रमावस्थेत बसचालकांना बसगाड्या हाकाव्या लागत आहेत. परिसरातील चारचाकी तसेच दुचाकीस्वारांनी येथील रस्त्याचा धसका घेत सध्या हणजुण - वागातोर ते म्हापसा असा दुसऱ्या मार्गाने प्रवास सुरू केला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या नेहमीच्या मार्गावरील बसेसना आपल्या पसंतीप्रमाणे रस्ता बदलता येत नसल्याने गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ मनस्ताप तसेच आर्थिक नुकसान सहन करत खासगी बसवाले याच मार्गाचा उपयोग करीत येथील प्रवाशांना सेवा देत असल्याचे गोवेकर यांनी यावेळी सांगितले.

Goa Roads: रस्त्यांतून खड्डे की खड्ड्यातून रस्ता अशा संभ्रमावस्थेत बसचालकांना बसगाड्या हाकाव्या लागत आहेत
Goa Assagao: आसगावातील जमिनीला सोन्याचा भाव, २५०० विक्री-करार, हाय प्रोफाईल व्यक्तींची मालमत्ता

महिला कंडक्टरची व्यथा

चंदन बेतकर या महिला कंडक्टरने या भागातील खासगी प्रवासी बसेसवर कंडक्टर नियुक्त करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आपण स्वतः बसवर कंडक्टर म्हणून राबत असल्याचे सांगितले. खासगी बसेसच्या मालकांना कदंब बसेसप्रमाणे सरकारी वाली नसतो. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय परवडेल की नाही अशी शंका बोलून दाखविली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com