Congress Seva Dal road safety Dainik Gomantak
गोवा

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Congress Seva Dal road safety: राज्यात मागील २०२१-२५ या काळात झालेल्या रस्ते अपघातांची संख्या आणि त्यात मृत्यू पडलेल्यांची संख्या पाहिल्या ती चिंताजनक आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात मागील २०२१-२५ या काळात झालेल्या रस्ते अपघातांची संख्या आणि त्यात मृत्यू पडलेल्यांची संख्या पाहिल्या ती चिंताजनक आहे. असे असताना राज्यातील भाजप सरकार रस्ता सुरक्षेला महत्त्व न देता वाहन नियमांच्या उल्लंघनातून दंड वसुलीला अधिक प्राधान्य देत असल्याचा आरोप काँग्रेसचे सेवा दलाचे प्रभारी विजय भिके यांनी केला.

काँग्रेस भवनात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेस सेवा दलाचे राजन घाटे व इतर सदस्य उपस्थित होते. भिके म्हणाले, राज्यातील महामार्ग हे महसूल गोळा करण्याचे सरकारी साधन बनले आहे. आत्तापर्यंत मागील पाच वर्षांत अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये युवकांचा अधिकतर समावेश असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे अनेकांना रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जीव गमवावा लागला आहे. २०२१ ते २६ या काळात राज्यात १४ हजार ५०० हून अधिक रस्ते अपघात झाले आहेत. त्यात १५२० निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. यावर्षी मागील सहा महिन्यांत १ हजार ३२४ अपघात झाले आहेत आणि १३२ जणांनी जीव गमावला आहे. एका बाजूला आपल्या घरातील कोणीतरी अपघातात गमावला म्हणून दुःख सहन करीत असताना दुसऱ्या बाजूला वाहतूक खाते २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३५५.१७ कोटींची दंडापोटी वसुली करीत आहे.

यावेळी भिके यांनी सरकारला दहा प्रश्न विचारताना त्या प्रश्नांविषयी काही स्पष्टीकरण व वास्तव मांडले आहे. ते पुढे म्हणाले, अपघातात युवकांचा मृत्यू होणे म्हणजे गोमंतकीय भावी पिढीचा अंत आणि आज रस्ते सुधारणा होत नसताना दंडाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वसुली केली जाते, हा गोमंतकीय मानवता आणि गोंयकारपणाचा ऱ्हास नाही काय? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

यावेळी सरकारला विचारलेले दहा प्रश्न असे ः ‘एआय कॅमेरा‘ चलन देण्याची प्रक्रिया वसुलीसाठी की सुरक्षेसाठी? वडाकडे आणि पर्वरी ब्लॅक स्पॉट्सवरील प्राणघातक अपघातांच्या घटनांकडे दुर्लक्ष? उत्तर गोव्याला मृत्यूच्या खाईत का ढकलले जातेय? उत्तर गोव्यातील २२ ब्लॅक स्पॉट्स दुरुस्ती कधी होणार आहे? गोमंतकीय दुचाकीस्वारांना महामार्गावर असुरक्षीत का सोडले आहे? २०२६ मध्ये अपघातात अचानक वाढ कशी झाली? ३५५ कोटी रुपयांचा निधी कुठे गेला? बेकायदेशीर अवजड वाहन पार्किंग आणि सर्व्हिस रोडवरील अनागोंदी थांबणार काय? महामार्गावर आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा अभाव? १५२० गोमंतकियांच्या मृत्यूची जबाबादारी कोणाची?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

SCROLL FOR NEXT