Mapusa Bus Station Dainik Gomantak
गोवा

Mapusa Bus Stand: म्हापसा बसस्थानक समस्यांचे आगार; फलकांची वानवा, निर्गमनस्थळाची दयनीय स्थिती

Mapusa KTC Bus Stand: प्रवासी व इतर संबंधितांच्या आवश्यक सुरक्षिततेच्या तपासणीसाठी म्हापसा केटीसी बसस्थानकाची पाहणी करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Bus Stand News

म्हापसा: प्रवासी व इतर संबंधितांच्या आवश्यक सुरक्षिततेच्या तपासणीसाठी म्हापसा केटीसी बसस्थानकाची शुक्रवारी (ता.२३) पाहणी करण्यात आली. उत्तर गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा देखरेख कक्षाने विविध विभागांच्या अधिकाऱ्यासह आज संयुक्त पाहणी केली. यावेळी स्थानकाचे प्रवेश व निर्गमनस्थळाची दयनीय स्थिती बनली आहे. तसेच साइनेज बोर्डची वानवा प्रकर्षाने यास्थळी आहे. अशावेळी पाहणीचा कृती अहवाल बनवून तो जिल्हाधिकाऱ्याकडे येत्या महिन्याभरात सादर केला जाईल.

म्हापसा बसस्थानकात सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्वच्छतेचा अभाव, पार्किंगवर होत असलेल्या अतिक्रमणामुळे बसस्थानक समस्यांचे आगार बनले आहे.

आजच्या पाहणीचा अधिकाऱ्यायांकडून आठवड्याभरात प्राथमिक अहवाल बनविला जाईल व त्यानंतर महिन्याभरात अंतिम अहवाल बनवून तो जिल्हाधिकाऱ्‍यांकडे कार्यवाहीसाठी पाठविला जाईल. या पाहणीवेळी केटीसीएलचे अधिकारी, गोवा कॅन, वाहतूक पोलीस, म्हापसा नागरी आरोग्य केंद्रचे आरोग्यधिकारी, पालिका अभियंता, साबांखा, वीजचे अधिकारी उपस्थित होते.

गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स म्हणाले की, म्हापसा मार्केटमध्ये अनेक विषय खितपत पडले आहेत. स्थानकाच्या आवारात साईनेज बोर्डची कमतरता आहे. तसेच सेप्टीक टाकीमध्ये पाणी साचून राहिल्याने डासांच्या उत्पत्तीचे हे केंद्रस्थान बनले आहे. यापुढे साबांखा व पालिकेचे कार्यक्षेत्राच्या सीमांचे सीमांकन केले जाईल.

जेणेकरून समस्यांवरून कुठल्याही प्राधिकरणाने यापुढे आपले हात झटकू नयेत. या पाहणीच्या प्राथमिक कृती अहवालात खर्च व आराखडा बनवून तो आठवड्याभरात तयार केला जाईल. त्यानंतर महिन्याभरात अंतिम अहवाल बनवून तो अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल.

बसस्थानकात पार्किंगचा मोठा मुद्दा आहे. या जागेत रेंट-अ-बाईकवाल्यांकडून अतिक्रमण करून या ठिकाणी पार्किंग होते. यातील काही वाहनांवर आरटीओ पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

स्थानकावर मोठ्या प्रमाणात बेबंद पडीक वाहनांचा मुद्दा चर्चेस आला. ज्यात सरकारी वाहनांचा समावेश आहे. ते ताबडतोब हटविण्याची मागणी करण्यात आली. तसेच बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच कचरा फेकला जातो. त्यामुळे परिसराला गलिच्छ रुप येते. यात बदल होण्याची आवश्यकता आहे.

पिचकारीवाल्यांवर कारवाई करा!

बस स्थानकातील फुटपाथ, बस थांबे, भिंती, इमारतीचे कोपरे, पिचकारी बहाद्दरांनी तांबड्या रंगाने रंगवलेले आहेत. या पिचकारी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी प्राधिकरणांनी यास्थळी थुंकताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई दंडात्मक मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे रोलंड मार्टिन्स म्हणाले

विक्रेत्यांवर कारवाई

मार्केट सबयार्ड बाहेरील बसस्टॅण्डच्या जागेत बेकायदा केळी विक्री करणाऱ्यांना संयुक्त पाहणीवेळी हटविण्यात आले. ते विक्रेते अस्वच्छ जागेत व वाटेवर बसून आपला व्यवसाय करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT